Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Closing : शेअर बाजार शानदार उसळीने बंद, सेन्सेक्स 60,000 पार

Stock Market Closing

Image Source : www.moneycontrol.com

होळीपूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. निफ्टी पुन्हा 17,700 च्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र, दिवसभरातील उच्चांकावरून बाजारात थोडीशी घसरण दिसून आली. आज दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक समभागांमध्ये घसरण होती.

होळीपूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. निफ्टी पुन्हा 17,700 च्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र, दिवसभरातील उच्चांकावरून बाजारात थोडीशी घसरण दिसून आली. आज दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक समभागांमध्ये घसरण होती. निफ्टी बँक दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 300 अंकांनी खाली बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले. बीएसई मार्केटमध्ये आज 2.12 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आज बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?

आज दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 117 अंकांच्या वाढीसह 17,711 वर बंद झाला तर सेन्सेक्स 415 अंकांच्या वाढीसह 60,224 वर बंद झाला. निफ्टी बँक देखील 99 अंकांनी वधारला, त्यानंतर तो 41,350 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही 262 अंकांच्या वाढीसह 30,960 च्या पातळीवर बंद झाला.

अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये वाढ

आज अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीचे शेअर्स वगळता अदानी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये आजही तेजी पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेसमध्ये अलीकडच्या नीचांकी वरून सुमारे 94% आणि अदानी पोर्ट्समध्ये सुमारे 50% वाढ दिसून आली. सलग 5 दिवसांच्या वाढीसह, या काळात अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कोणत्या शेअर्सवरमध्ये अँक्शन दिसली?

  • ब्रोकरेज डाउनग्रेडनंतर, ब्रिटानिया आज निफ्टीच्या सर्वात घसरलेल्या समभागांपैकी एक होता. हा स्टॉक आज सुमारे 2% च्या घसरणीसह बंद झाला. टाटा मोटर्स 3% वाढीसह बंद झाला. कंपनीने माहिती दिली आहे की वार्षिक आधारावर फेब्रुवारी महिन्यात JLR ची विक्री सुमारे 33% वाढली आहे.
  • आज ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्येही खरेदी दिसून आली. पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीमध्ये सर्वाधिक 2-3% वाढ झाली. अशोका बिल्डकॉनच्या CGD आर्म युनिसन एन्व्हायरोच्या अधिग्रहणानंतर MGL आज 9% वर बंद झाला.
  • SMR जर्सीमधील अतिरिक्त स्टेक खरेदी केल्यानंतर संवर्धन मदरसन जवळपास 4% वाढीसह बंद झाला. पाइपलाइन टॅरिफ आणि ब्रोकरेज अहवालावरील नवीनतम अपडेटनंतर GAIL आज 4% वाढला.

सकाळी खरेदीदारांमध्ये उत्साह

शेअर मार्केटमध्ये आज सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येते. सकाळी सेन्सेक्स 60,007 तर निफ्टी 17680 अंकांवर ओपन झाला. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व 30 कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी आहे तर निफ्टीमधील 50 पैकी 41 शेअर्समध्ये तेजी दिसून येते. जागतिक पातळीवरील मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत. एसजीएकस निफ्टी मध्ये 75 अंकांची वाढ दिसून आली. तर आशिया मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. तर अमेरिकेतील बाजारातही शुक्रवारी 2 टक्क्यांची वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला.

Source: https://bit.ly/3kTpgLR   

https://bit.ly/3EZtEjs