गुरुवारी भारतीय शेअर बाजार (Share Market) मोठ्या तेजीने सुरु झाला. परंतु शेअर बाजार बंद होण्यापूर्वी, गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे, बाजाराने आपली आघाडी गमावली. ज्यामुळे बाजारही लाल रंगात आला. सेन्सेक्स त्याच्या हाय पॉइंटवरुन 360 अंक खाली घसरला, तर निफ्टी सुद्धा 100 पॉइंटने घसरली. आजचे ट्रेडिंग संपताच, सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचीत तेजीसोबत 61,319 तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 18,035 वर बंद झाले आहेत.
सेक्टरोल अपडेट
आजच्या ट्रेडिंग सत्रात, जेथे बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, कंज्युमर ड्यूरेबल्स सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर आयटी, तेल आणि वायू, आरोग्य सेवा, इन्फ्रा, ऊर्जा, मेटल्स सेक्टमध्ये तेजी पहायला मिळाली. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात 1.62 टक्क्यांनी किंवा 500 अंकांनी वाढून 31,434 अंकांवर बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्येही तेजी दिसून आली. 30 सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये, 14 शेअर्स तेजीसह तर 16 घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये, 27 तेजीसह, तर 23 घसरणीने बंद झाले.
शेअर्समधील चढ-उतार
आजच्या व्यापारात ओएनजीसी 5.69 टक्के, टेक महिंद्रा 5.49 टक्के, ओपोलो हॉस्पिटल 3.46 टक्के, डिव्हिज लॅब 1.91 टक्के, नेस्ले 1.91 टक्के, टाटा स्टील 1.54 टक्के, अदानी बंदर 1.43 टक्के, कोल इंडिया 1.06 टक्के, टीसीएस 1.06 टक्के, अदानी एन्टप्रायजेस 0.98 टक्के तेजीने बंद झाले आहेत. घसरण दिसलेल्या शेअर्समध्ये बीपीसीएलने 1.65 टक्के, एचडीएफसी लाइफ 0.87 टक्के, एचयूएल 0.84 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.81 टक्के, बजाज फायनान्स 0.81 टक्के, आयशर मोटर्स 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
आजचा शेअर बाजार थोडक्यात
गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख शेअर निर्देशांकांमध्ये तेजी दिसली. या कालावधीत, बीएसई सेन्सेक्स 379.15 गुणांनी वाढून 61,654.24 वर पोहोचला. एनएसई निफ्टी 108.25 गुणांनी 18,124.10 पर्यंत वाढली. टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स हे प्रमुख वाढ नोंदवलेल्या शेअर्समध्ये होते. सुरुवातीच्या व्यापारात, सेन्सेक्सच्या सर्व कंपन्या हिरव्या रंगात व्यापार करीत होत्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            