तुम्ही जर घरबसल्या कुठला उद्योग सुरु करण्याच्या विचारात असाल आणि कमीत कमी भांडवल तुमच्याकडे असताना आणि कमीत कमी जागेत जर कुठला व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
आजकाल अनेक तरुण-तरुणी प्रिंटेड टी-शर्ट घालताना तुम्ही पाहिले असतील. सध्या या प्रिंटेड टी-शर्टची क्रेझ आहे. कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना असे कस्टमाईज प्रिंटेड टी-शर्ट घालणे आवडते. हे लक्षात घेऊन आणि तुमचा विक्रेता वर्ग समोर ठेऊन तुम्ही टी-शर्ट प्रिंटींगचा व्यवसाय सुरु करू शकता. चला तर जाणून घेऊयात हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे.
ट्रेंड ओळखा
सध्याच्या काळात फार लवकर लवकर ट्रेंड बदलत आहेत. ज्या तरुण-तरुणींना लक्षात ठेऊन तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचा उद्देश आहे ते सध्या कुठला ट्रेंड फॉलो करत आहेत हे जाणून घ्या. सध्या कोरियन ड्रामाचा तरुणाईवर प्रभाव आहे. कोरियन ट्रेंड लक्षात घेऊन तसे टी-शर्ट विक्रीसाठी आणता येतील का असाही विचार करायला हरकत नाही.
उपकरणे आणि कच्चा माल
मुख्य म्हणजे हा बिजनेस सुरु करताना तुम्हाला टी-शर्ट प्रिंटिंग उपकरण खरेदी करावे लागणार आहे. यासाठी हीट प्रेस (Heat Press) किंवा स्क्रीन प्रिंटिंग (Screen Print) सेटअप तुम्हांला खरेदी करावा लागेल. या मशिनच्या माध्यमातून तुम्ही उच्च दर्जाचे प्लेन टी-शर्ट छपाई करू शकाल.
उत्तम क्वालिटीचे हीट प्रेस (Heat Press) मशीन 15 ते 20 हजारांत तुम्ही खरेदी करू शकाल. तर स्क्रीन प्रिंटिंग (Screen Print) मशीन देखील याच रेंजमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.
मुंबई, गुजरात शहरांत टी-शर्ट स्वस्तात मिळतील. तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर केल्यास तुम्हांला एक टी शर्ट 200-300 रुपयापर्यंत पडू शकतो. त्यावर प्रक्रिया करून तुम्ही हाच प्रिंटेड टी-शर्ट 1000 रुपयांत विकू शकता. प्रॉफीट कमावण्याची भरपूर संधी या उद्योगांत आहे.
डिझाईन्स आणि ब्रँडिंग
तुम्ही तरुणाईला आकर्षित करतील अशा डिझाईन्स तयार करायला हव्यात. तुमची उत्पादने ऑनलाइन मार्केटप्लेसवर विक्रीसाठी ठेवा. यासाठी तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्याशी देखील टाय-अप करू शकता. एवढेच नाही तर आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात Etsy किंवा Shopify सारखे प्लॅटफॉर्म देखील वापरा.
तुमचे काम लोकांना दाखवण्यासाठी काही नमुने तयार करा आणि स्मॉल सिलेब्रेटीज (Small Celebraties) जसे की ज्यांचे सोशल मिडियावर 10 हजारांपर्यंत फॉलोअर्स आहेत अशांना तुमच्या व्यवसायाचे ब्रँडिंग आणि जाहिरात करायला लावा. यासाठी तुम्हाला एखाद-दोन टी-शर्ट त्यांना द्यायला लागले तरीही मागे-पुढे पाहू नका.
उद्योगाच्या ट्रेंडबाबत अपडेटेड रहा, ग्राहकांकडून वेळोवेळी फीडबॅक गोळा करा आणि तुमच्या डिझाइन्स आणि ऑफरिंगमध्ये सतत सुधारणा करा. त्यामुळे व्यवसायात साचलेपण येणार नाही आणि ग्राहकांना आकर्षित करू शकता.
गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध राहून, तुम्ही टी-शर्ट प्रिंटींगच्या व्यवसायातून उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत निर्माण करून तुमच्या घरच्या घरी आरामात टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसायाची स्थापना करू शकता.