• 05 Feb, 2023 14:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SUD Life चा सेंच्युरी गोल्ड प्लॅन: तुमच्या अटींवर प्रीमियम पेमेंट ठरवण्याचा पर्याय देणारी विमा पॉलिसी माहित आहे का?

Insurance Policy

Star Union Dai-ichi Life Insurance (SUD Life) ह्या लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनीने नुकतेच “SUD लाइफ सेंच्युरी गोल्ड प्लॅन” हे नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कस्टमर्सना त्यांच्या “प्रीमियम पेमेंटच्या अटी” ठरविता येतात. याचसोबत आकर्षक “गॅरंटीड मॅच्युरिटी लाभ” देखील प्रदान करण्याची देखील हमी देण्यात आली आहे.

Star Union Dai-ichi Life Insurance (SUD Life) ह्या लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनीने नुकतेच  “SUD लाइफ सेंच्युरी गोल्ड प्लॅन” हे नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कस्टमर्सना त्यांच्या “प्रीमियम पेमेंटच्या अटी” ठरविता येतात. याचसोबत आकर्षक “गॅरंटीड मॅच्युरिटी लाभ” देखील प्रदान करण्याची देखील हमी देण्यात आली आहे.  (Star Union Dai-ichi Launches Life Century Gold Insurance Plan With Flexible Premium And Guaranteed Additions)

हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड, वैयक्तिक सेविंग लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे. 5 लाख ते 30 लाख रुपयांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेली कुटुंबे आणि तरुण पालकांना बचतीचे अधिकाधिक फायदे मिळावेत, या मुख्य उद्देशाने ह्या पॉलिसीचे डिजाईन केले गेले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये मिळणाऱ्या लाईफ कव्हर सोबतच जमा झालेले "गँरंटीड रिटर्न्स” भविष्यातील बचत म्हणून सुरक्षित करता येऊ शकेल, अशी माहिती SUD लाईफ कंपनीकडून देण्यात आली आहे.

या प्लॅनमध्ये दोन पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करता येईल

क्र गोल्ड प्लॅन अंतर्गत पर्याय प्रवेशाचे किमान (Entry Age)किमान मॅच्युरिटी (Maturity Age)
1गोल शुअर (Goal Sure) 0-18  दिवस18 वर्ष
2एज्यु शुअर (Edu Sure)18 वर्ष33 वर्ष

Goal Sure प्लॅन मधील कमाल प्रवेश वय 55 आणि 60 निश्चित करण्यात आले आहे. Edu Sure प्लॅन मधील प्रवेशाचे कमाल वय मात्र 50 वर्षे असणार आहे. Goal Sure आणि Edu Sure प्लॅन्स मध्ये कमाल मॅच्युरिटी वय हे अनुक्रमे 80 वर्षे आणि 72 वर्षे असेल.

दरवर्षी पॉलिसी वर्धापनदिनानिमित्त प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सी मध्ये बदल करण्याची सुविधा देखील दिली गेली आहे. तसेच कस्टमर्स आपल्या सोयीनुसार प्रिमिअम पेमेंट टर्म (PPT) 5 वर्षे, 6 वर्षे, 8 वर्षे किंवा 10 वर्षे, यांपैकी एक निवडू शकतात. ही पॉलिसी “गॅरंटीड ॲडिशन्स”चा पर्याय देखील देते. ही अमाऊंट पॉलिसी-वर्षाच्या शेवटी जोडली जाणार आहे. आणि  मॅच्युरिटी, सरेंडर किंवा डेथ बेनिफिट, यापैकी जे आधी असेल, आणि प्लॅन पर्यायानुसार दिले जाईल, त्यानुसार  पॉलिसीधारक किंवा त्याची नॉमिनी व्यक्ती यांना देण्यात येणार आहे.

मृत्यू लाभ (Death Benefits) तीन प्रकारांत दिला जाऊ शकतो - मृत्यूवरील विमा रक्कम, मासिक उत्पन्न लाभ (Monthly Income Benefit) आणि एकरकमी लाभ (Lump Sum). पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा देखील आहे, जी पॉलिसी सरेंडर मूल्याच्या 70% इतकी असू शकते.आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C आणि कलम 10 (10D) अंतर्गत कर लाभ मिळू शकतात.

SUD लाइफ सेंच्युरी गोल्ड हा मुख्यतः वाढत्या मध्यमवर्गाला लक्ष्य करत आहे. PRICE (People Research on India's Consumer Economy, 2021) या आर्थिक संशोधन संस्ठेचा सर्वेक्षणानुसार, भारतातील मध्यमवर्ग 2004-2005 मधील 14% वरून 2021 मध्ये 31% पर्यंत म्हणजे दुप्पट झाला आहे आणि यापुढे सन 2047 पर्यंत हे प्रमाण 63% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तेव्हा मध्यमवर्गीयांना या प्रॉडक्टचा लाभ घेण्याची “सुवर्ण-संधी” आहे.