Star Health and Allied Insurance Company Shares At Discount: स्टार हेल्थ कंपनीचे शेअर्स त्याच्या आयपीओ (IPO) किंमतींपेक्षा जास्त सवलतीत व्यवहार करत आहे. झुनझुनवाला पोर्टफोलिओच्या या स्टॉकचा विमा उद्योगातील आगामी वाढीसाठी फायदा देणारा असेल, असे शेअर बाजार तज्ज्ञ विवेक नाडकर्णी यांनी म्हटले आहे. ब्रोकरेजच्या अहवालानुसार, कोविड-19 शी संबंधित दावे आणि हॉस्पिटलायझेशन दर कमी झाल्यामुळे डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा वाढण्याची अपेक्षा आहे आणि हा नफा 95 टक्क्यांपर्यंत मिळू शकतो. यामुळे कंपनी सध्या चर्चेत आली आहे, तर कंपनीचे शेअर्स चक्क 38 टक्के सवलीत उपलब्ध झाले आहेत, यामुळे गुंतवणुकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्टॉकमध्ये 42 टक्के परतावा मिळेल (The stock will return 42 percent)-
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टार हेल्थ शेअर्सवर 830 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तर सध्याची किंमत 586 आहे. या संदर्भात, स्टॉकमध्ये 42 टक्के परतावा मिळू शकतो. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की जीवन आणि सामान्य विमा कंपन्या डिसेंबर तिमाहीत चांगले परिणाम देऊ शकतात.
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की डिसेंबरच्या तिमाहीबद्दल बोलायचे झाल्यास, स्टार हेल्थच्या प्रीमियममध्ये मध्यम वाढ दिसून येईल. त्याच वेळी, 95 टक्के च्या एकत्रित गुणोत्तरासह नफ्यात उडी असू शकते. प्रीमियम वाढ वार्षिक आधारावर 12 टक्के अपेक्षित आहे. लार्ज ग्रुप पोर्टफोलिओमधून माघार घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाच्या धोरणाचा आहे. कोविड-19 शी संबंधित दावे कमी झाल्यामुळे आणि हॉस्पिटलायझेशनच्या संख्येत घट झाल्यामुळे, एकत्रित गुणोत्तर सुधारेल आणि नफा वाढेल. 2023 वर्षात 240 कोटींचा नफा होणे अपेक्षित आहे.
विक्रमी उच्चांकावरून 38% सवलतीवर शेअर (Shares at 38% discount)-
स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा 17.4 टक्के हिस्सा आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे एकूण 10 कोटी 75 लाख 3 हजार 935 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 5 हजार 909.2 कोटी रुपये आहे. यांचा पोर्टफोलिओ आता पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे 17 लाख 87 हजार 977 शेअर्स आहेत.
गेल्या 1 वर्षात स्टॉक 25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, त्याच्या उच्च 940 वरून सुमारे 38 टक्के सूट आहे. 900 रुपयांच्या आयपीओ (IPO) किमतीपासून ते सुमारे 30 टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. कंपनीचा आयपीओ (IPO) 10 डिसेंबर 2021 रोजी आला होता.