Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel: लवकर लाँच होणार Airtel चा Xstream AirFiber 5G, पारंपारिक वाय-फाय राउटरला असणार पर्याय

Airtel's Xstream AirFiber 5G

Airtel's Xstream AirFiber 5G: एअरटेल लवकरच पोर्टेबल हॉटस्पॉट डिव्हाईस लाँच करण्याच्या तयारीत आहे. एअरटेल Xstream AirFiber 5G नावाचे हॉटस्पॉट सोल्यूशन बाजारात आणण्यावर काम करत आहे, जे कंपनीच्या 5G कनेक्टिव्हिटीवर काम करेल. हे एअरफायबर राउटरच्या स्वरूपात येईल.

Airtel's Xstream AirFiber 5G: Jio Fiber शी स्पर्धा करण्यासाठी Airtel ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये Xstream AirFiber 5G लाँच करू शकते. Airtel च्या Xstream AirFiber 5G ची किंमत जवळपास 6,000 रुपये असू शकते. एअरटेल एक्सस्ट्रीम एअरफायबर अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. हे रिलायन्स जिओच्या JioAirFiber सारखे असेल, जे पारंपारिक वाय-फाय राउटरला पर्याय म्हणून सादर केले गेले आहे. Xstream AirFiber 5G वापरकर्ते ते फक्त प्लग इन करून वापरू शकतात.

6 महिन्यांच्या प्लॅनसह केल्या जाईल लाँच

मात्र,एअरटेल कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तर कंपनीचे Companion अ‍ॅप Google Play Store वर स्पॉट झाले आहे. अ‍ॅप सूचीवरून हे देखील दिसून येते की डिव्हाइस 6 महिन्यांच्या 100Mbps स्पीड प्लॅनसह लाँच केल्या जाईल.

पुढील दोन महिन्यात करणार लाँच

जिओ फायबरशी स्पर्धा करण्यासाठी एअरटेल ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आपला Xstream AirFiber 5G लाँच करू शकते . Airtel च्या Xstream AirFiber 5G ची किंमत जवळपास 6,000 रुपये असू शकते. हे डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी एअरटेल एक्सस्ट्रीम एअरफायबर अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. हे Reliance Jio च्या JioAirFiber सारखेच असेल, जे पारंपारिक वाय-फाय राउटरला पर्याय म्हणून सादर केले गेले आहे.

कसे असेल डिव्हाइस

Airtel चे Airfiber एका टॉवरसारखे दिसते ज्यामध्ये तुम्हाला समोर 3 LED इंडिकेटर मिळतील. जर पहिला इंडिकेटर निळ्या रंगाचा प्रकाश दाखवेल, तर याचा अर्थ तुमचा एअर फायर 5G नेटवर्कशी कनेक्ट झाला आहे. जर इंडिकेटर सतत ब्लिंक करत असेल तर डिव्हाइस 4G नेटवर्कवर आहे. त्याच वेळी, दुसऱ्या इंडिकेटरमध्ये, तुम्हाला नेटवर्क कव्हरेज आणि तिसऱ्यामध्ये कनेक्टिव्हिटी स्थिती माहिती पडेल.

सिम कार्ड कुठे लागेल

डिव्हाइसच्या तळाशी, तुम्हाला सिम कार्ड लावण्याचा पर्याय मिळेल. यासाठी तुम्हाला एअर फायबरखाली ठेवलेले कव्हर काढावे लागेल. डिव्हाइसच्या मागील बाजूस, तुम्हाला चार्जिंग केबल, USB आणि इथरनेट केबलचा पर्याय मिळेल. एअरटेलने अद्याप या उपकरणाची अधिकृत घोषणा केलेली नाही. हॉटस्पॉट उपकरण अनेक वापरकर्त्यांसाठी वरदान ठरू शकते.

कसा होईल फायदा

प्राप्त माहितीनुसार,  Airtel Xstream AirFiber 5G कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 राउटर ऑफर करेल.  Airtel 6 महिन्यांसाठी 100Mbps स्पीडसह 2,994 रुपये (अंदाजे रुपये 499 प्रति महिना) अशी योजना देखील लाँच करेल. हे नियमित एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅनपेक्षा खूपच स्वस्त आहे, जे 499 रुपयांमध्ये 40Mbps पर्यंत स्पीड ऑफर करते.