Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Independence Day sale:स्वांतत्र्यदिना निमित्त सोनीच्या उपकरणांवर धमाकेदार ऑफर, पैशांची होईल बचत

Independence Day sale:स्वांतत्र्यदिना निमित्त सोनीच्या उपकरणांवर धमाकेदार ऑफर, पैशांची होईल बचत

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोनी इंडिया कंपनीने 4 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालवधीसाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या किमतीवर बंपर सुट देणारा Sony Independence Day Sale सुरू केला आहे. यामध्ये टीव्ही (TV), साऊंड बॉक्स (Sound Box), हेड फोन्स (HeadPhones) विविध प्रकारचे कॅमेरे यासह इतरही काही उपकरणे ग्राहकांना सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत.

स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील नागरिक सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मार्केटमध्ये बऱ्याचशा ऑफर्स सुरू झाल्या आहेत. त्याच प्रमाणे इलेक्टॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणाऱ्या जगप्रसिद्ध सोनी कंपनीने 'स्वांतत्र्यदिन सेल' (Sony Independence Day Sale) सुरू केला आहे. या सेलमध्ये सोनी कंपनीकडून कोणकोणत्या उपकरणांवर सवलत देण्यात आली आहे याबाबतचा आढावा आपण घेणार आहोत..

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोनी इंडिया कंपनीने 4 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालवधीसाठी इलेक्ट्रॉनिक्स  वस्तूच्या किमतीवर बंपर सुट देणारा Sony Independence Day Sale सुरू केला आहे. यामध्ये टीव्ही (TV), साऊंड बॉक्स (Sound Box), हेड फोन्स (HeadPhones) विविध प्रकारचे कॅमेरे यासह इतरही काही उपकरणे ग्राहकांना सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. तसेच ग्राहकांना खरेदीवर कॅशबॅक आणि सोयीस्कर EMI सारख्या सुविधाही या सेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

टीव्ही खरेदीसाठी EMI ची सुविधा

सोनी स्वातंत्र्यदिन सेलमध्ये ग्राहकांना सोनी ब्राव्हिया टीव्ही( Sony BRAVIA)च्या निवडक मॉडेलवर 20000 रुपयांपर्यतचा कॅशबॅक मिळवता येणार आहे. तसेच सोनीच्या BRAVIA XR टेलिव्हिजनवर ग्राहकांची 24,000 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. तसेच सोनीच्या या प्रोडक्टवर 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. याच बरोबर ग्राहकांना या सेलच्या निमित्ताने EMI ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सवलतीमध्ये दर्जेदार गेमिंग हेडफोन्स

सोनीच्या हेडफोन्स दमदार मानले जातात. या सेलमध्ये सोनीच्या हेडफोन्सच्या किमतीवरही मोठी सवलत देण्यात आली आहे. सोनीच्या गेमिंग हेडफोन्स खरेदी कराये असतील तर त्यामध्ये Sony INZONE H9, WH-G900N या वायरलेस नॉईज कॅन्सलिंग गेमिंग हेडसेट 3000  रुपयांची सवलत देण्यात आली असून तो 16,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याच प्रमाणे H7, WH-G700 हा हेडफोन 12,990 रुपये H3, MDR-G300 हा 4,990 रुपयांत खरेदी करता येणार आहे.तसेच सोनीच्या इअरबड्सच्या खरेदीवर तब्बल 9,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. तसेच सोनीचा WI-C100 हा वायरलेस नेकबँड हेडफोन 1,399 रुपयांना उपलब्ध आहे.

स्पीकर आणि कॅमेऱ्यावर सवलत

सोनीचे ब्लूटूथ स्कीकर्स देखील या सेलमध्ये तुम्हाला सवलतीमध्ये खरेदी करता येणार आहेत. यामध्ये यासाठी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. तसेच सोनीचा नुकताच लॉन्च झालेला पार्टी स्पीकर देखील तुम्हाला 13 हजार रुपयांपासून 64 हजार रुपयांपर्यंतचे स्पीकर या सेलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सोनी कंपनीच्या ZV-E1 या कॅमेऱ्यासाठी देखील विशेष ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये  कॅमेऱ्यांवर तब्बल  19,170 रुपयापर्यंतची सवलत देण्यात आली आहे.