सुप्रसिद्ध बॉलिबुड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची कन्या आणि उद्योगपती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांची पत्नी सोनम कपूरला (Sonam Kapoor) आपण सगळेच ओळखतो. आज 9 जून रोजी तिचा वाढदिवस असून तिने 37 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. आजपर्यंत तिने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.
सुरुवातीला एकापाठोपाठ एक 6 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर 'सावरिया' (Saawariya) या डेब्यू चित्रपटातून ती नावारूपाला आली. तिच्या स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने लाखो चाहत्यांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण केली आहे. आज तिच्याकडे अलिशान बंगला, वेगवेगळ्या कारचे कलेक्शन आहे. त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सोनम कपूरचे एकूण नेट वर्थ किती?
सोनम कपूरचे (Sonam Kapoor) एकूण नेट वर्थ 15 मिलियन अमेरिकन डॉलर इतके आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 115 कोटी रुपये इतकी आहे. सोनम सध्या टेलिव्हिजन निर्माती, अभिनेत्री म्हणून काम करत आहे. ब्रँड एंडोर्समेंटच्या (Brand Endorsement) माध्यमातून तिला सर्वाधिक पैसे मिळतात. त्यासाठी साधारण ती 1 ते 1.5 कोटी रुपये चार्ज करते. तसेच एक फिल्म साइन करण्यासाठी सोनम 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम चार्ज करते.
याशिवाय तिने रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात देखील मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला मोठी रक्कम प्राप्त होते. विशेष म्हणजे सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या अभिनेत्रींनमध्ये तिचे नाव घेतले जाते. कमाई सोबत सोनम चॅरिटी आणि सोशल कॉजसाठी दानधर्म देखील करते.
मुंबईतील आलिशान बंगल्याची मालकीण
सोनम कपूरने 2014 साली मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. ज्याची एकूण किंमत 24.6 कोटी रुपये आहे. तिच्या या प्रॉपर्टीचे तुम्ही सोशल मीडियावर फोटो देखील पाहू शकता.
कार कलेक्शन बाबत जाणून घ्या
सोनम कपूरकडे अनेक महागड्या कार आहेत. या कारचा समावेश जगभरातील महागड्या गाड्यांमध्ये केला जातो. तिच्या या कार कलेक्शनमध्ये मिनी कूपर (Mini Cooper), मर्सिडीज बेंज (Mercedes Benz) आणि ऑडीचा (Audi) समावेश आहे.
ब्रँड अँबेसिडर म्हणून कार्यरत होती
सोनम कपूरने अनेक ब्रँडसाठी ब्रँड अँबेसिडर (Brand Ambassador) म्हणून काम केले आहे. कोलगेट, लक्स, ओपो मोबाईल, Mont Blanc आणि सिग्नेचर या ब्रँडची ती ब्रँड अँबेसिडर होती.
Source: jansatta.com