• 07 Dec, 2022 09:19

Snacks companies in Share Market: 'बिकाजी' पूर्वी ‘या’ नमकीन उत्पादकांनी शेअर मार्केटमध्ये घेतली एंट्री

IPO, Snacks Industry, Namkeen Industry

बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. आतापर्यंत शेअर बाजारात आघाडीच्या स्नॅक्स कंपन्यांनी भांडवल उभारले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

बिकाजी स्नॅक्सने आयपीओ बाजारात नुकतीच एन्ट्री केली आहे. बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आतापर्यंत शेअर बाजारात आघाडीच्या स्नॅक्स कंपन्यांनी भांडवल उभारले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

स्नॅक्स उत्पादनांच्या बाजारातील यल्लो डायमंडचे कुरकुरे आणि विविध स्नॅक प्रकार आपण नेहमीच खातो. 2002 मध्ये केवळ 3 कर्मचाऱ्यांसोबत अमित कुमत यांनी प्रताप स्नॅकचा पाया रचला. आज जवळपास 750 जण प्रत्यक्षपणे आणि 3000 जण अप्रत्यक्षपणे प्रताप स्नॅकसोबत काम करत आहेत. आज स्नॅक्स तयार करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांच्या यादीत प्रताप स्नॅक्सची (Pratap Snacks) गणना होते. शेअर बाजारातही स्नॅक्स कंपनीच्या यादीत प्रताप स्नॅक्सच्या शेअर्समध्ये चढ-उतार पहायला मिळतात. 5 ऑक्टोबर 2017 रोजी सेकंडरी इक्विटी मार्केटमध्ये प्रताप स्नॅक्स इंडस्ट्रिजने प्रवेश केला.

बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेड (Balaji Foods And Feeds Limited)

स्नॅक्स उत्पादनांच्या बाजारात अग्रणी असलेल्या कंपन्यांपैकी बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेडची सुरुवात 1984 मध्ये उत्तर प्रदेशच्या पिलिभीत येथे झाली. लता अगरवाल आणि गोजरीश चंद्र अगरवाल यांनी केवळ 10000 रूपये एवढ्या तुटपुंज्या भांडवलात बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेडची स्थापना केली. त्यानंतर वेळोवेळी स्नॅक्स च्या बाजारात विविध उत्पादने आणत बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेड कंपनी नावारुपाला आली. शेअर बाजारातही स्नॅक्स कंपन्यांच्या यादीत बालाजीच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेड स्टॉक मार्केटमध्ये सक्रिय नाही.  

बिकानेरवाला फुड्स (Bikanerwala Foods Private Limited)

मिठाई आणि स्नॅक्समध्ये अग्रणी असलेला बिकानेरवाला आता सर्वात मोठी रेस्तराँ साखळी असलेली कंपनी म्हणून ओळखली जात आहे. 115 वर्षांपूर्वी राजस्थानमधील बिकानेर येथील लालजी कुटुंबियांचे मिठाई आणि स्नॅक्सचे दुकान होते. त्यानंतर 1950 मध्ये लालजी कुटुंबातील दोन सदस्य व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने दिल्लीला गेले. तेथे त्यांनी पारंपरिक मिठाई आणि नमकीनचे वेगवेगळे प्रकार सुरू केले. त्यानंतर 1960 मध्ये करोलबाग आणि दिल्लीच्या प्रमुख भागांमध्ये त्यांनी बिकानेर नावाने अनेक दुकानं उघडली. 1968 मध्ये बिकानेरवाला फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्याम सुंदर अग्रवाल यांनी एअर टाइट पॅकेजिंगमध्ये मिठाई आणि नमकीन लाँच केले. अशाप्रकारे त्यांनी बिकानेर ब्रँड जागतिक स्तरावर नेला. सध्या बाजारात बिकानो नावाने स्विट्स आणि स्नॅकचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. बिकानेरच्या स्टॉक मार्केटमधील स्थितीकडे पाहिल्यास मागील काही दिवसांपासून बालाजी फुड्स अँड फिड्स लिमिटेड स्टॉक मार्केटमध्ये सक्रिय नाही.  

पारले जी (Parle-G)

लोकप्रिय बिस्कीट ब्रँड पारले-जीची कहाणी पण रंजक आहे. ब्रिटीशकालीन भारतात आताच्या मुंबईमध्ये 1929 मध्ये चौहान कुटुंबियांनी पारले-जी बिस्कीट्सच्या उत्पादनांना सुरुवात केली. पूर्वी फक्त बिस्कीट्स बनवणाऱ्या कंपनीने काही वर्षांनी नमकीन स्नॅक्स प्रकारातही आपले नशीब आजमावयास सुरुवात केली. एवढ्या वर्षांच्य लोकप्रियतेमुळेच की काय शेअर बाजारातही आज पारले-जी आपल्याला सक्रिय दिसत आहे.