स्मार्टफोन्स प्रमाणेच स्मार्टवॉचेसमध्ये स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्यांनी स्मार्टवॉचच्या किंमतीत कमी केल्या आहेत. एका अहवालानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत स्मार्टवॉच निम्म्याने स्वस्त झाली आहेत. परवडणाऱ्या किंमतीत चांगल्या ब्रॅंड्सचे स्मार्टवॉच उपलब्ध झाल्याने या गॅझेटच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
वेरिअबल गॅझेट (मनगटावर बांधता येणारे घड्याळ) गॅझेट श्रेणीत स्मार्टवॉच सर्वात लोकप्रिय आहे. वेरिअबल सेगमेंटच्या बाजारात स्मार्टवॉचचा सर्वाधिक 26.8% वाटा आहे. दरवर्षी या उत्पादनाची बाजारपेठ 40% ने वाढत आहे.
भारतातत स्मार्टवॉच उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये बोट, नॉइज, ओप्पो, फायर बोल्टस बोल्ट ऑडिया या पाच कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र मागील वर्षभरात या श्रेणीत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामुळे कंपन्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंमती करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
या पाचही ब्रॅंड्सनी मागील वर्षभरात स्मार्टवॉचच्या किंमती 50% ने कमी केल्या आहेत. आयडीसी या कंपनीच्या अहवालानुसार भारतात स्मार्टवॉचची सरासरी किंमत मागील वर्षाच्या तुलनेत 44.9% कमी झाली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टवॉचची किंमत सरासरी 2000 रुपयांच्या दरम्यान आहे. मागील वर्ष स्मार्टवॉचची किंमत 3800 ते 4000 रुपये इतकी होती. या मार्केटमध्ये बोट कंपनीचे वर्चस्व आहे. बोटचा जवळपास 26.6% हिस्सा असून त्याखालोखाल नॉइज कंपनीचा 13.5% हिस्सा आहे.
किंमती कमी झाल्याने स्मार्टवॉचची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत स्मार्टवॉचचा पुरवठा 12.8% ने वाढला आहे. वर्ष 2022 च्या तुलनेत स्मार्टवॉचची बाजारपेठ 40% ने वाढली आहे.