Wi-Fi Speed Tips: जर तुम्ही एखादा चित्रपट पहात असाल, गाणे एकत असाल किवा आॅफिसची मिटिंग असेल आणि वाय-फायची रेंज गेली तर तुम्ही थोडे टेंशनमध्ये येता. तुमचे हेच टेंशन कमी करण्यासाठी आणि वाय-फायला जर चांगला स्पीड हवा असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, तुम्ही त्याचे पालन केल्यास, नक्कीच तुम्हाला वाय-फायला चांगलीच स्पीड मिळेल हे नक्की.
Table of contents [Show]
- राउटर टेबलवर ठेवू नये (Do not Place the Router on a Table)
- वाय-फाय रेंजसाठी हॉलची करा निवड (Select the Hall for Wi-Fi Range)
- राउटरची जागा (Location of the Router)
- राउटर उंच ठिकाणी असावे (The Router Should be in a High Place)
- राउटर घराच्या मध्यभागी असावा (The Router should be in the Center of the House)
राउटर टेबलवर ठेवू नये (Do not Place the Router on a Table)
तुम्ही जर तुमचे वाय-फाय राउटर टेबलवर ठेवले असेल तर ते त्वरित थांबवा. राउटरला कधी ही कवर घालू नये. कारण कवरच्या अडथळयामुळे सिग्नल पोहोचणे मुश्किल होते. त्यामुळे इंटरनेट समस्या निर्माण होते.
वाय-फाय रेंजसाठी हॉलची करा निवड (Select the Hall for Wi-Fi Range)
वाय-फाय राउटर नेहमी हॉलमध्ये ठेवावे. कारण हॉल हा मोठा असल्यामुळे चांगले कव्हरेज मिळते. तसेच इंटरनेट रेंजसाठी काहीही अडथळा येत नाही.
राउटरची जागा (Location of the Router)
मोबाईल, लॅपटाॅपला वाय-फायची रेंज चांगली मिळावी यासाठी घरात वाय-फाय रायटर ठेवण्यासाठी उत्तम जागेची निवड करणे आवश्यक आहे. घराचे सिलिंग ही एक सर्वोत्तम जागा आहे. कारण हे उंचावर असल्याने, तुम्हाला इंटरनेटची रेंज मिळण्याची समस्या निर्माणच होणार नाही.
राउटर उंच ठिकाणी असावे (The Router Should be in a High Place)
जर तुम्हाला घरातील वाय-फायचा स्पीड वेगवान पाहिजे असेल तर वाय-फाय उंचावर असणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे चांगली रेंज मिळते व त्याचा सिग्नलवर काहीच परिणाम होत नाही.
राउटर घराच्या मध्यभागी असावा (The Router should be in the Center of the House)
वाय-फायसाठी राउटर हा नेहमी घराच्या मध्यभागी बसवावा. कारण तुम्ही घराच्या कोणत्याही खोलीत असाल, तर तुमच्या मोबाईल व इतर साधनांना परफेक्ट रेंज मिळू शकते. त्याठिकाणी तुम्हाला सिग्नल मिळण्याचा अडथळा येणार नाही. त्यामुळे वाय-फाय वापरताना या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.