Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Price Of AI Generated Image: शटरस्टॉकने लाँच केले एआय जनरेटर, वापरण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Price Of AI Generated Image

Price Of AI Generated Image: एआय टुल्स किती आणि कोण कोणते आहेत जे आपल्याला अनेक बाबतीत सहाय्यक ठरतात, याची खूप मोठी आहे, अगदी यादी बनवायला मदत करणारे टूल, फोटो एडिटींगसाठी, लिखाण, सोशल मिडिया मार्केटींग इत्यादी. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी एआय इमेजस शेअर करत आहेत, त्यामुळे एआय जनरेटेड इमेजबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, त्यातच शटरस्टॉकने एआय जनरेटर प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

AI Image Generator Tool: प्रसिद्ध अमेरिकन स्टॉक फोटोग्राफी कंपनी शटरस्टॉकने (Shutterstock) आपला नुकतेच नवे फीचर लाँच केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI: Artificial Intelligence) इमेज जनरेटर (Image generator) प्लॅटफॉर्म आणले आहे. जगभरातील शटरस्टॉक वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी साइट ऑफर करत असलेल्या प्रत्येक भाषेत ते उपलब्ध असणार आहे.

अधिकृत पत्रकात, शटरस्टॉकचे सीईओ पॉल हेनेसी म्हणाले, शटरस्टॉकने त्यांचे जनरेटिव्ह एआय संशोधन पुढे नेण्यासाठी ओपनएआय, मेटा आणि एलजी एआय रिसर्च सारख्या आघाडीच्या उद्योगातील खेळाडूंसोबत गेल्या दोन वर्षांत धोरणात्मक भागीदारी विकसित केली आहे. आता आम्ही सक्षम बनलो आणि आमच्या ग्राहकांसाठी जनरेटिव्ह एआय क्षमता आणत आहोत. याचा उपयोग एआय प्रतिमा जनरेट करण्यासाठी प्रत्येक युजरला करता येऊ शकतो. त्यांना कोणत्या विषयावर काय शोधायचे आहे ते कीवर्डस लिहून सर्च केल्यावर, काही सेकंदात एआय विविध पर्याय उपलब्ध करून देईल. हे जनरेटर उच्च दर्जाच्या प्रतिमा तयार करण्यास सक्षम आहे.

हेनेसी म्हणाल्या की, हे जनरेटिव्ह प्लॅटफॉर्म कथाकारांच्या कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल करेल. तुम्हाला यापुढे डिझाइन तज्ज्ञ असण्याची किंवा जबरदस्त प्रतिमा तयार करण्यासाठी क्रिएटीव्ही टीमची आवश्यकता भासणार नाही. 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, शटरस्टॉकने (Shutterstock) ओपनएआयसोबत (OpenAI) आपली भागीदारी वाढवली, कलाकारांना त्यांच्या योगदानाची भरपाई करण्यासाठी एक फंड लाँच केला आणि एआय- उत्पन्न सामग्रीशी संबंधित इन्साइट्स गोळा केले आणि जनरेटर लाँच करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित केले. या भागीदारीचा उद्देश्य जगभरातील शटरस्टॉक वापरकर्त्यांना ओपनएआयच्या प्रतिमा निर्मिती क्षमतांचा परिचय करून देणे हा होता.

एआय इमेज जनरेटर कसे कार्य करते (How AI Image Generator Works)

  • सर्वप्रथम, तुम्हाला शटरस्टॉकच्या वेबसाइटवर जावे
  • वेबसाईटच्या साईडबारमध्ये, एआय जनरेटर हा पर्याय आहे. तो सापडला नाही तर सर्चबारमध्ये एआय जनरेटर टाईप करून सर्च करावे.
  • एआय जनरेटर समोर आले की, त्याच्या सर्चबारमध्ये कोणत्याही विषयाचे कीवर्ड लिहून सर्च करावे.
  • अगदी पुढच्या सेकंदाला एआय त्याविषयावरी विविध इमेजेस आपल्यासमोर आणते.
  • त्यापैकी आवडलेल्या इमेजला डाऊनलोड करण्यासाठी पुढेच पर्याय दिलेला असतो.
  • आता तुम्हाला जे शोधायचे आहे ते टाइप करा.

शटरस्टॉकचे एआय इमेज जनरेटर वापरण्यासाठी शटरस्टॉकचे पेड सबस्क्राईबर असण्याची गरज नाही आहे. मात्र साईन इन केलेले असणे गरजेचे आहे. मात्र हे जनरेट झालेले इमेजेस मोफत डाऊनलोड करता येत नाहीत. स्टँडर्ड डाऊलोड केले तर आपल्याला त्या इमेजचा केवळ मर्यादीत वापर करता येतो, ते इमेज जाहिरात, प्रिंट कुठेही पण मर्यादीत स्वरुपात वापरता येते. याची स्टँडर्ड लायसन्स घेऊन डाऊनलोड करून वापरण्यासाठी प्रति इमेज 1.66 युएस डॉलर मोजावे लागतात. वर्षाचे सबस्क्रिप्शनही घेता येते, 299 युएस डॉलरमध्ये 10 इमेजेस डाऊनलोड करून वापरता येतील, तर 1 हजार 649 युएस डॉलरमध्ये 350 इमेजेस मिळतील. जर, एनहान्स लायसन्स घ्यायचे असेल तर 99.50 युएस डॉलरला प्रति इमेज मिळेल. यात 5 इमेजसाठी 449 तर 25 इमेजसाठी 1 हजार 699 युएस डॉलर 
एवढे भरावे लागतील.

जाहिरात कॅम्पेन, डिजिटल मार्केटींग आदींसाठी मोठ्या प्रमाणात इमेजेस, व्हिडीओज लागतात, सध्या अॅनमेटेड व्हिडीओजही मोठ्या प्रमाणात वापरले जातात, कंपन्यांच्या एक्स्प्लेनर व्हिडीओमध्येही अनेक इमेजेसची गरज असते, अशावेळी फक्त व्हिडीओ एडिटरला नियुक्त बाकी सर्व लागणार मजकूर अशा स्टॉक वेबसाईट्सवरुन घेतला जातो. त्यामुळे या एआय जनरेटरचा फायदा अशा ग्राहकांसाठी होऊ शकतो, असा विश्वास हेनेसी यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.