शाॅर्ट टर्म म्हटले की आरडी किंवा एफडीचा पर्यायच सर्वांना दिसतो. मात्र, या व्यतिरिक्त ही गुंतवणूक करता येते. हे बऱ्याच जणांना माहिती नसते. यात प्रामुख्याने तुम्ही डेब्ट मयुच्युअल फंड, काॅर्पोरेट एफडी, काॅर्पोरेट बाॅण्ड या ठिकाणी देखील गुंतवणूक कर शकता. तसेच, या ठिकाणी गुंतवणूक करुन तुम्ही अल्पावधीतच चांगला रिटर्न ही मिळवू शकता.
डेब्ट म्युच्युअल फंड
तुम्ही कॉर्पोरेट बाॅण्ड फंड, बॅंकिंग आणि पीएसयू फंड आणि शॉर्ट टर्म फंड यांसारख्या कॅटेगरींच्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड सामान्यत: एफडीच्या तुलनेत खूप चांगले रिटर्न देतात. तसेच पोस्ट-टॅक्स रिटर्न बहुतेकदा अधिक अनुकूल असतात. कारण, रिडेम्प्शननंतरच टॅक्सचा संबंध येतो. त्यामुळे तुम्ही शाॅर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणार असाल तर डेब्ट म्युच्युअल फंड तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
कॉर्पोरेट एफडी
सध्या मार्केटमध्ये कॉर्पोरेट एफडीची चलती पाहायला मिळत आहे. कारण, या ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला बॅंकापेक्षा अधिक रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही बजाज फायनान्स आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट सारख्या डिपाॅझिट स्वीकारणाऱ्या नाॅन बॅंक फायनान्शियल कंपन्यांच्या (NBFC) कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करु शकता. हा देखील तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो.
कॉर्पोरेट बाॅण्ड्स
कॉर्पोरेट बाॅण्ड्स म्हटल्यावर तुम्हाला रिस्क आणि रिटर्न घेण्याची तयारी ठेवावी लागते. कमीतकमी रिस्क असलेले हाय क्वालिटीचे बाॅण्ड 7 ते 8.5 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात. जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत असाल तर सिक्युअर बाॅण्डचा पर्याय निवडू शकता. यात तुम्हाला 9 ते 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो.
वरील पर्याय बॅंक एफडीच्या जागी तुम्ही निवडू शकता. कारण हे पर्याय तुम्हाला लिक्विडीटी आणि सुरक्षा देतात. तसेच, यासह चांगला रिटर्न ही मिळवून देतात. तुम्हाला या ठिकाणी गुंतवणूक करायची असल्यास रिस्क आणि मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. याशिवाय तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला ही घेऊ शकता.