Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारे 41 शेअर्स! 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारे 41 शेअर्स! 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा

Image Source : www.moneycontrol.com

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना मालामाल करणारे, 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा देणारे स्टॉक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. जून तिमाही भारतीय शेअर बाजारातली गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम तिमाही ठरली आहे. या कालावधीत शेअर बाजारानं चांगलेच विक्रम प्रस्थापित केले आहेत.

शेअर बाजारात (Share market) सध्या 41 शेअर्सनं गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलं आहे. मागच्या केवळ 3 महिन्यांचा आढावा घेतला तर या स्टॉक्सनं (Stocks) 100 टक्क्यांपेक्षादेखील अधिक परतावा दिला आहे. या 41 समभागांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर (Multibagger)असा परतावा दिल्याचं दिसून आलं आहे. यात किमान 500 कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांचाच समावेश करण्यात आला आहे. जून तिमाहीत निफ्टी 50मध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. कारण विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 13 अब्ज जमा केले. इतर कोणत्याही तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीत एफपीआयनं (FPIs) सर्वाधिक गुंतवणूक केली.

कोणते समभाग?

टानला प्लॅटफॉर्म (Tanla Platforms), सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy), टेक्समॅको रेलसिस्टम (Texmaco Railsystems), जेबीएम ऑटो (JBM Auto), जिंदल सॉ (Jindal Saw), माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders), आयनॉक्स विंड एनर्जी (Inox Wind Energy), फोर्स मोटर्स (Force Motors) आणि ऑरिऑन प्रो सोल्यूशन्स(Aurionpro Solutions) हे टॉप मल्टीबॅगर रिटर्न शेअर्समध्ये आहेत.

120 टक्क्यांहून अधिक परतावा

फोर्स मोटर्सनं जून तिमाहीत 122 टक्के परतावा दिला आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्मॉलकॅप ऑटो समभागांपैकी तो एक होता. इलेक्ट्रिक वाहन निर्माता ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या स्टॉकमध्ये एप्रिलपासून 120 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जेबीएम ऑटोनं गेल्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केल्याचं दिसून आलं आहे. या काळात जय भारत मारुतीनं 127 टक्‍क्‍यांनी उसळी घेतली.

आर्थिक वर्ष 2023-24मध्ये दिला मल्टीबॅगर परतावा

जेआयटीएफ इन्फ्रालॉजिस्टिक्सनं (JITF Infralogistics) एप्रिलपासून 633 टक्के परतावा दिला आहे. रेमेडी लाइफकेअरनं (Remedy Lifecare) 441 टक्के इतका परतावा दिला आहे. याच कालावधीत ऑरिऑन प्रो सोल्यूशन्सनं (Aurionpro Solutions) 219 टक्के, श्री ग्लोबल ट्रेडफिन (Shree Global Tradefin) 200 टक्के, रिफेक्स इंडस्ट्रीज (Refex Industries) 192 टक्के, पटेल इंजिनियरिंग 190 टक्के इतका परतावा दिला आहे.

100 टक्क्यांच्या वर परतावा

मास्टर ट्रस्ट (Master Trust) 189 टक्के, Ddev Plastiks Industries 168 टक्के, माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders) 159 टक्के, केपी एनर्जीनं 147 टक्के, वडार व्हेंचर्सनं 140 टक्के, द फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोरनं 138 टक्के, के सोल्व्स इंडिया, निनटेक सिस्टम्सनं 133 टक्के आणि डी नोरा इंडियानं 132 टक्के परतावा दिल्याची नोंद करण्यात आलेली आहे.