Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

झोमॅटोच्या शेअर्समध्ये 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ!

zomato shares

झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.

Zomato Shares Price : फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने 12 मे 2022 रोजी एनएसई (National Stock Exchange) वर 50.05 रूपये इतकी निचांकी पातळी गाठली होती. पण गेल्या आठवड्यापासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 5 दिवसात झोमॅटोच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या याच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.

झोमॅटोच्या शेअर्सने आतापर्यंतची निचांकी पातळी गाठल्यानंतर या शेअर्समध्ये अचानक वाढ होऊ लागली आहे. कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाच्या घोषणेनंतर कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनानंतर झोमॅटोच्या शेअर्सच्या किमतीत मोठी चढउतार झाली आहे.

मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत अहवालात झोमॅटोचा एकत्रित निव्वळ तोटा 360 कोटी रूपये झाला आहे; जो गेल्या वर्षी 134.2 कोटी होता. गेल्या वर्षीच्या याच तिमाही अहवालात महसुल वाढीत 692.4 कोटी रूपयांच्या तुलनेत या वर्षीच्या तिमाही अहवालात 75.01 टक्क्यांनी वाढ होऊन महसूल 1,211.8 कोटी रूपये जमा झाला होता. कंपनीचा तोटा वाढला असला तरी शेअरला मात्र फायदा झाला.

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, झोमॅटो कंपनीने जाहीर केले आहे की, त्यांच्याकडे सुमारे 12,200 कोटी रूपयांचे भांडवल मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे; सध्या त्यांची भांडवलाची गरज मर्यादित आहे. तसेच कंपनीने व्यवस्थापकीय खर्च समाविष्ट करण्याचे आणि आगामी तिमाही अहवालात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मार्केटमधील शेअर्सची किंमत (Zomato Share Price) वाढत आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर्स आहे, त्यांनी तो तसाच ठेवावा. पण नवीन गुंतवणूकदारांनी सध्या कोणतीही पोझिशन घेऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

झोमॅटो कंपनीने आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत ऑपरेटिंग आणि आर्थिक बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर दबाव होता. त्यावेळी त्यात जवळपास 65 टक्क्यांनी घसरण झाली होती. बुधवारी, दि. 1 जून, 2022 रोजी कंपनीचा शेअर्स 79.80 रुपयांवर पोहोचला होता. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे मते, झोमॅटोचा शेअर 115 रुपयांपर्यंत (Zomato stock prediction) पोहोचू शकतो. चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

डिसक्लेमर :वर व्यक्त केलेली मते ही विश्लेषक व संबंधित तज्ज्ञांची आहेत; 'महामनी'ची नाहीत.