Amazon अॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीला 31 मार्च, 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत 3.8 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. गेल्या 20 वर्षात कंपनीला पहिल्यांदाच इतका तोटा सहन करावा लागला. यामुळे अॅमेझॉनचा शेअर 14 टक्क्यांनी कोसळला.
Amazon shares fall 14% for worst day since 2006https://t.co/7vYnI5LW7x pic.twitter.com/LsvJlgJn7q
— CNBC Now (@CNBCnow) April 29, 2022
अॅमेझॉनचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांना वैयक्तिकरीत्या आणि किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे अमेरिकेच्या एसअँडपी 500 इंडेक्स 3.6 टक्क्यांनी कोसळला. नॅसडॅक 100 इंडेक्स 4.5 टक्क्यांनी घसरला. यामुळे जेफ बेझॉस यांच्या संपत्तीतून एका दिवसात 20.5 अब्ज डॉलर्स कमी झाली असून त्यांची संपत्ती 148.4 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आहे. 2022 च्या सुरूवातील बेझॉस यांची संपत्ती 210 अब्ज डॉलर्स इतकी होती. म्हणजे गेल्या 4 महिन्यात बेझॉस यांच्या संपत्तीतून 44 अब्ज डॉलर्सने संपत्ती कमी झाली.
अॅमेझॉनने सादर केलेल्या तिमाही अहवालात नमूद केले आहे की, कंपनीला जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत 3.8 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये चौथ्या तिमाहीत कंपनीला 8.1 अब्ज डॉलर्सचा नफा झाला होता.