Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ShareChat Layoff: तब्बल 600 कर्मचारी बेरोजगार

ShareChat

ShareChat Layoff: मोठ्या टेक कंपन्यांनंतर, भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी केली आहे. ताज्या प्रकरणात, शेअरचॅटने 20 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत.

ShareChat Layoffs News: भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. याआधी, फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म (Fantasy Gaming Platform) बंद करून 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने कर्मचारी कपात करत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी ShareChat ने सुमारे 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जे व्यवस्थित काम करत नव्हते. कंपनीच्या सीईओने एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे ज्यामध्ये आणखी कठोर निर्णय घेतले जाण्याची भीती आहे.

मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड (Mohalla Teck Private Limited) या कंपनीकडे, शेअरचॅट (Share Chat)आणि मोज (Moj) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी आहे. सध्या कंपनीने आपले कर्मचारी 20 टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा अर्थ कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात देखील मोहल्ला टेकने फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म Jeet11 बंद करताना 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

ShareChat: 'कठीण आणि वेदनादायक निर्णय'

कर्मचारी कपातीची पुष्टी करताना, शेअरचॅटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “एक कंपनी म्हणून आम्हाला आमच्या इतिहासातील काही सर्वात कठीण आणि वेदनादायक निर्णय घ्यावे लागले आणि आमच्या प्रतिभावान कर्मचार्‍यांपैकी अंदाजे 20 टक्के कर्मचाऱ्यांना आम्हांला काढून टाकावे लावले आहे." कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेण्यात आला आहे, असेही सांगितले गेले आहे.

बाधित कर्मचाऱ्यांना मिळणार हे लाभ!

शेअरचॅटचा असा विश्वास आहे की बाजाराची स्थिती पाहता या वर्षी गुंतवणूक करताना खूप सावध राहावे लागेल. कंपनी लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) आणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या नोटिस कालावधीचा पूर्ण पगार, कंपनीमध्ये कार्यरत असताना प्रत्येक वर्षासाठी दोन आठवड्यांचा पगार आणि डिसेंबर 2022 पर्यंत वेरीएबल पे, या सर्वांचे 100% लाभ मिळणार आहे. याशिवाय उर्वरित सुट्ट्यांच्या बदल्यात 45 दिवसांपर्यंतचे पेमेंटही दिले जाईल.

2015 पासून ShareChat कार्यरत!

शेअरचॅट हे भारतातील सर्वात लोकप्रिय असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात त्याच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 400 दशलक्ष आहे. 2015 मध्ये अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी मिळून हे ऍप सुरू केले होते. शेअरचॅट व्यतिरिक्त, कंपनी Moj हे दुसरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील चालवते, जे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.