Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Crash : सेन्सेक्स 1100 अंकांनी, तर निफ्टी 15,900 च्या खाली

Share Market Crash : सेन्सेक्स 1100 अंकांनी, तर निफ्टी 15,900 च्या खाली

आज शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स (Sensex), निफ्टीसह (Nifty 50) बँका, आयटी, फार्मा, ऊर्जा, ऑईल अॅन्ड गॅस आणि रिअॅलिटी सेक्टरसह बऱ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली; रूपयानेही निचांकी दर गाठला.

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील विक्रीच्या दबावाचा परिणाम आजही भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्समध्ये (Sensex) 1158.08 अंकाची तर निफ्टीमध्ये (Nifty 50) 359.10 अंकांची घसरण होऊन तो 15808 वर बंद झाला. तर बॅंकनिफ्टी (BankNifty) जोरदार अशी 1161 अंकांची घसरण झाली. आज दिवसभर बॅंकांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्यांकन कमी झाले.

आज शेअर मार्केटमध्ये ऑटो, मेटल, बँक, आयटी, फार्मा, ऊर्जा, ऑईल अॅण्ड गॅस आणि रिअॅलिटी सेक्टरसह बऱ्याच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

भारतीय शेअर मार्केट आज सकाळी सुरू होताच सेन्सेक्स 644.54 अंकानी खाली घसरला. तर निफ्टी निर्देशांकही 16 हजाराच्या खाली, 15,993 अंकावर व्यवहार करत होता. दिवस अखेरीस मार्केट बंद होताना सेन्सेक्स 52,930 वर तर निफ्टी 15,808 अंकांवर बंद झाला.  भारतीय गुंतवणूकदारांना गुरूवारीही (दि.12 मे) मोठ्या प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागले. यूएस कन्झ्युमर प्राईस डेटानंतर (U.S. consumer price data) इक्विटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली, परिणामी रूपयाने ऐतिहासिक निचांकी दर गाठला. आज रूपया 19 पैशांनी घसरला असून, एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 77.42 झाली. शेअर मार्केटमध्ये आज दिवसभर विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले.

जागतिक शेअर बाजारातील विक्री आणि अमेरिकेतील वाढती महागाई याचा भारतीय शेअर मार्केटवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यामुळे बॅंकिंग, मेटल, ऑटो आदी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये बरीच पडझड झाल्याचे होत असल्याचे दिसून आले. आज शेअर मार्केटमधील अडीच हजारांहून अधिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर 747 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले.