आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्राने भारतीय शेअर बाजाराला दिलासा दिला आहे. अदानी समूह आणि सरकारी बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. एका क्षणी सेन्सेक्स 1000 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता. आजच्या व्यवहाराअंती बीएसई (BSE – Bombay Stock Exchange) सेन्सेक्स 882 अंकांच्या उसळीसह 59,797 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 266 अंकांच्या उसळीसह 17,589 अंकांवर बंद झाला.
Table of contents [Show]
आज शेअर बाजार कसा होता?
आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास 950 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीने 17600 चा टप्पा पार केला. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बँक, वित्तीय आणि धातू समभागांमध्ये जोरदार खरेदी आहे. सध्या, सेन्सेक्स 938 अंकांची वाढ दर्शवत आहे आणि 59,847.41 च्या पातळीवर आहे. तर निफ्टी 286 अंकांच्या घसरणीनंतर 17,606.65 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसले. बाजाराच्या या तेजीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4 लाख कोटींची वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
आज बाजाराच्या सुपर रॅलीमध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 4 लाख कोटींनी वाढले. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप गुरुवार, 2 मार्च रोजी बाजार बंद होताना 2,59,99,044.52 कोटी रुपये होते. जे 3 मार्च रोजी दुपारी 2 पर्यंत वाढून 2,63,71,077.69 कोटी झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.80 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी समूहाचे शेअर्स वाढले
आज अदानी समूहाच्या शेअर्सने बाजाराला चालना दिली आहे. अदानी पोर्ट्स 8 टक्क्यांनी वाढून 675 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्रायझेस आज 14 टक्क्यांनी वाढून 1837 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी विल्मार आज 5 टक्क्यांनी वधारला आहे. एनडीटीव्ही (NDTV) 5 टक्क्यांनी वधारला आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जीचे समभागही आज 5 टक्क्यांनी वधारले.
बँक समभागांमध्ये जोरदार खरेदी
आजच्या व्यवहारात बँक समभागांमध्ये जोरदार खरेदी आहे. बँक निफ्टी 2.33 टक्क्यांनी वाढला. दुसरीकडे, पीएसयू (PSU Bank) बँक निर्देशांक 5 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला. आर्थिक निर्देशांकही २ टक्क्यांनी मजबूत झाला. याशिवाय धातू निर्देशांक 3.5 टक्क्यांनी मजबूत झाला. रियल्टी निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला.
Source: https://bit.ly/3ZATrWN