पठाणच्या यशानंतर शाहरुख खानचा जवान (Jawan) हा चित्रपट मोठ्या पडद्यावर 7 सप्टेंबरपासून झळकणार आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आजपासून (दि. 1 सप्टेंबर) सुरू झाले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या बुकिंगमध्ये अवघ्या काही दोन तासांच्या आत 41 हजार 500 तिकिटे विकली गेली.
शाहरुखच्या या चित्रपटाची तिकिटे काळ्या बाजारातदेखील खूप भाव खात आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या एका तिकिटासाठी शाहरुखचे चाहते 2 हजार रुपये द्यायला तयार आहेत.
रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे या चित्रपटाचे प्रोडक्शन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतात 7 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. याचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. तसेच 2डी आणि आयमॅक्स अशा दोन्ही फॉर्ममध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.
पहिल्या दिवशी 41,500 तिकिटांची विक्री
शाहरुख खानचा यापूर्वीचा चित्रपट पठाण यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या वर्षातील सर्वाधिक गल्ला जमवणारा चित्रपट तो ठरला. आता त्यानंतर येऊ घातलेल्या 'जवान' बद्दल लोकांमध्ये खूपच उत्सुकता आहे. तिकिट विक्री सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 41 हजार 500 तिकिटे विकली गेली आहेत.
काळ्या बाजारात तिकिटाची किंमत 2 हजारांवर
'जवान' चित्रपटाच्या तिकिटांवर लोकांनी पहिल्याच दिवशी हल्लाबोल केल्याने, ब्लॅक मार्केटमध्ये या तिकिटाची मागणी वाढली आहे. मुंबई, दिल्लीतील काही चाहत्यांनी शाहरुखच्या या चित्रपटाचे तिकिट 2 हजार ते 2400 रुपयांना खरेदी केल्याचे वृत्त हिंदी सीएनबीसी18 ने एका रिपोर्टच्या अहवालानुसार दिले आहे.
'जवान'च्या तिकिट विक्रीला पहिल्याच दिवशी जो प्रतिसाद मिळाल आहे. त्यावरून हा चित्रपटसुद्धा कमाई करण्याचा विक्रम करेल, असे दिसून येते. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे की, पहिल्या दिवशी हिंदी चित्रपटातून जवळपास 70 कोटी, तर साऊथमधून 20 कोटी आणि जगभरातून अंदाजे 125 कोटी रुपयांचा गल्ला एका दिवसात जमा करेल.