Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Today Live: सेन्सेक्समध्ये 500 अंकांची तेजी, तर निफ्टी 17700 पार

Stock Market Today Live

Stock Market Today Live: शेअर मार्केटमधील ग्रुप A मधील अदानी इंटरप्रायजेस, प्रीवी स्पेशालिटी, कीर्ती इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकोस या कंपन्यांचे शेअर्स तेजी आहेत. तर हिंदुजा ग्लोबल, बेंगाल अॅण्ड आसाम कंपनी, ब्रिटानिया, कॅरासिल, इंडिगो पेंट्स या ग्रुप A मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

Stock Market Today Live: शेअर मार्केटमध्ये आज सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येते. सकाळी सेन्सेक्स 60,007 तर निफ्टी 17680 अंकांवर ओपन झाला. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व 30 कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी आहे तर निफ्टीमधील 50 पैकी 41 शेअर्समध्ये तेजी दिसून येते. जागतिक पातळीवरील मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत. एसजीएकस निफ्टी मध्ये 75 अंकांची वाढ दिसून आली. तर आशिया मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. तर अमेरिकेतील बाजारातही शुक्रवारी 2 टक्क्यांची वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला.

शेअर मार्केटमधील ग्रुप A मधील अदानी इंटरप्रायजेस, प्रीवी स्पेशालिटी, कीर्ती इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकोस या कंपन्यांचे शेअर्स तेजी आहेत. अदानी इंटरप्रायजेस कंपनीच्या शेअर्समध्ये 13.28 टक्क्यांची वाढ दर्शवत आहे. तर हिंदुजा ग्लोबल, बेंगाल अॅण्ड आसाम कंपनी, ब्रिटानिया, कॅरासिल, इंडिगो पेंट्स या ग्रुप A मधील कंपन्यांमध्ये घसरण होत आहे.

bse sensex 6 march 2023
Source: www.money.rediff.com/

अदानी समुहातील वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. यामुळे अदानी समुहातील बऱ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती. त्यात अदानी पॉवर कंपनी अंतर्गत असलेल्या मुंदडा प्लान्ट हा कर्जाखाली दबला होता. त्यात कंपनीला यातून सुमारे 180 कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागत आहे. पण कंपनीने गुंतवणूकदारांना यातून लवकरच बाहेर पडू आश्वासन देत त्यांच्या विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. कारण सोमवारी (दि. 6 मार्च) अदानी पॉवरच्या कंपनीत 5 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्समध्ये प्रति टन 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कच्च्या तेलासाठी एका टनामागे 4,400 रुपये मोजावे लागणार आहेत. तर विमानासाठी वापरले जाणारे इंधन आणि डीझेलवरील टॅक्समध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्याचबरोबर वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी कंपनीच्या कर्जाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे सांगत, कंपनीकडे पुरेसा निधी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वेदांता कंपनीच्या शेअर्ससाठी खरेदीदार उत्साह दाखवत आहेत.

सॉव्हरीन बॉण्ड आज ओपन होणार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियातर्फे दर 4 महिन्यांनी गुंतवणुकीसाठी खुला केली जाणारी सॉव्हरीन बॉण्ड योजना सोमवारीपासून खुली होत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील या योजनेचा हा चौथा टप्पा आहे. ही योजना 10 मार्चपर्यंत खुली असणार आहे. सोने गुंतवणूकदारांना 5,611 रुपये प्रति ग्रॅम दराने यामध्ये गुंतवणूक करता येईल.

महानगर गॅस युनिसॉन इनव्हायरो कंपनी ताब्यात घेणार

महानगर गॅस कंपनीने अशोक बिल्डकॉन कंपनीतील उपकंपनी युनिसॉन इनव्हायरो कंपनी खरेदी करण्यासाठी 531 कोटी रुपयांचा करार केला आहे. युनिसॉन इनव्हायरो कंपनीला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गॅस डिस्ट्रिब्युशनचे काम मिळाले आहे आणि या कामाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून परवानगी मिळाली आहे.