देशांतर्गत शेअर बाजारात पडझड होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. निफ्टीही 17450 पेक्षा कमी अंकावर बंद झाला आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 671.15 अंकांच्या घसरणीनंतर 59,135.13 अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. तसेच, निफ्टी 176.70 अंकांनी घसरून 17412.90 अंकांवर बंद झाला आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आठवडाभराच्या कालावधीत या शेअर्सने चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र दुसरीकडे एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी घसरण बघायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांना शुक्रवारी सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये घट दिसून आली आहे. आठवडाभरच्या कालावधीचा विचार केला तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 3.39 टक्क्यांची वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी 421. 45 रुपयांवर ट्रेड होत असणारा या शेअर्सचा भाव आता 435.75 रुपयावर बंद होताना आहे. शेअर्सच्या भावात 14.30 रुपयांची वाढ या कालावधीत झाली आहे. वर्षभरापूर्वी हा शेअर्स 435.75 रुपयांवर ट्रेड करत होता. या कालावधीत 1.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. Groww app वर याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 1 लाख 54 हजार 720 कोटी रुपये इतके आहे.
निफ्टी बँकेने 771 अंकांच्या घसरणीसह 40,500 अंकांची पातळी गाठली असून आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 262.7 लाख कोटी रुपयांवर आले आले. आठवड्याच्या पाचव्या दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये FMCG क्षेत्र वगळता, इतर सर्व क्षेत्रे लाल चिन्हावर बंद झाली आहेत. FMCG म्हणजे फास्ट मुविंग कंज्यूमर गूडस होय. यामध्ये विक्रेत्याला सामान्यत: मार्जिन कमी मिळते. मात्र यांची पटकन विक्री देखील वेगाने होते. साबण, टूथपेस्टसारख्या वस्तूंचा यामध्ये समावेश होतो. गुंतवणूकीसाठी शेअर बाजारात FMCG सेक्टरला अनेक गुंतवणूकदार हे सुरक्षित मानत असतात. याचे कारण म्हणजे, समजा बाजारात मंदी आली आहे. अशा स्थितीतही या वस्तूंचा वापर थांबवला जात नाही. वैयक्तिक खर्चाचे नियोजन करताना देखील हे खर्च प्राधान्याने केले जातात. यामुळे यातील गुंतवणूक देखील सुरक्षित मानली जाते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)