Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex at 62000: सेन्सेक्सने उच्चांक गाठला; 30 पैकी 12 शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला सकारात्मक परतावा

Share Trading, Equity Share, Top Gainers, Top Loser, BSE, NSE

Sensex at 62000: भारतीय शेअर बाजारांसाठी (Share Market) 24 नोव्हेंबर हा दिवस खास ठरला. बाजाराच्या प्रमुख निर्देशकांनी विक्रमी उच्चांक गाठला. यापूर्वी 19 ऑक्टोबर 2021 मध्ये सेन्सेक्सने 62,245 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे सेन्सेक्सला पुन्हा विक्रमी उच्चांक गाठायला जवळपास 13 महिने लागले.

सेन्सेक्सला पुन्हा विक्रमी उच्चांक गाठायला जवळपास 13 महिने लागले. 24 नोव्हेंबर रोजी व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 62,412 ची पातळी गाठली. 24 नोव्हेंबर हा दिवस भारतीय शेअर बाजारांसाठी (Share Market) खास ठरला. बाजाराच्या प्रमुख निर्देशकांनी विक्रमी उच्चांक गाठला. यापूर्वी 19 ऑक्टोबर 2021 मध्ये सेन्सेक्सने 62,245 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे सेन्सेक्सला पुन्हा विक्रमी उच्चांक गाठायला जवळपास 13 महिने लागले. 24 नोव्हेंबर रोजी व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 62,412 ची पातळी गाठली. मात्र दिवसअखेर  तो 62,204 वर बंद झाला. सेन्सेक्स 17 जून 2022 रोजी 50,921 पर्यंत खाली आला होता.

30 पैकी 12 शेअर्सने दिला सकारात्मक परतावा (12 out of 30 Shares Gave Positive Return's )

वाढती महागाई, वाढते व्याजदर, मंदीची भीती आणि भूराजकीय तणाव यामुळे जगभरातील वित्तीय बाजारांमध्ये (financial markets) घसरण झाली होती. यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात विक्रीला सुरुवात केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ने या काळात खरेदी करून बाजाराला मोठ्या घसरणीपासून वाचविले. गेल्या वर्षीच्या बाजारातील उच्चांक आणि यंदाचा उच्चांक या दरम्यानच्या सेन्सेक्स शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास तो कमी-अधिक प्रमाणात फ्लॅट झाल्याचे दिसून येते. 30 पैकी 12 शेअर्सनी गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला आहे. तर उर्वरित शेअर्स गेल्या वर्षीच्या विक्रमी उच्चांकाच्या पातळीच्या खाली घसरले आहेत.

एका वर्षात कोणत्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आणि कोणी पैसे बुडवले ते पाहूया.

या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला सकारात्मक परतावा (These shares gave positive returns to the investors)
या यादीत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, सन फार्मासियूटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड, लार्सन अँड ट्यूब्रो लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एक्सिस बँक लिमिटेड, नेस्टले इंडिया लिमिटेड आणि टायटन को लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होतो.

शेअर्सची निराशाजनक कामगिरी  (Shares of These Companies Fell)

या यादीत एचडीएफसी बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, एशिअन पेंट्स लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, हाऊजिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड, टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजिस लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज लिमिटेड, बजाज फिनजर्व्ह लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, विप्रो लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.