Why is my Gmail storage full after deleting everything: सोशल मिडीयाच्या दुनियेत प्रत्येक व्यक्तीचे जीमेल आयडी असतात. तसेच हे अकाऊंट प्रत्येक सोशल अकाउंटला लिंक असतात. त्यामुळे येणारे मॅसेज थेट जीमेलवर येतात. त्यामुळे जीमेलचा इनबाॅक्स फुल होतो व इतर मॅसेज येण्यास अडचणी निर्माण होतात, त्यामुळे जीमेलचा इनबाॅक्स हा रिकामा कसा करायाचा याबाबत जाणून घेवुयात.
जीमेलवर शक्यतो, 15 जीबी स्पेस उपलब्ध असते. त्यामुळे मोठया एमबीच्या फाइल्स असतील तर ही स्पेस लवकर फुल होते. त्यामुळे हा स्टोरेज फुल झाल्यावर काही जणांना स्टोरेज विकत घ्यावे लागते किंवा काही फाईल्स डिलिट मारावे लागतात. पण आपल्याला एक एक फाइल डिलिट करण्यास बराच वेळ जातो, नेमकी तुमचा हाच वेळ वाचविण्यासाठी जीमेल इनबाक्स कसा रिकामा करायचा हे पाहूयात
आजकालच्या सोशलमिडीयाच्या दुनियेत प्रत्येक व्यक्तीचे जीमेल अकाउंट असते. कोणी नोकरीच्या शोधात असेल तर तो व्यक्ती दररोज जीमेल चेक करतो. कुठून आपल्याला नोकरीची आॅफऱ आली का, हे पाहण्यासाठी तो वारंवार जीमेलवर जातो. पण या सर्व गडबडीत तो जीमेल इनबाॅक्स फुल होईपर्यंत स्पेसकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे येणारे जीमेल मॅसेज मिळण्यास त्याला अडचणी निर्माण होतात. यामध्ये एखादया नोकरीची आॅफर ही जाऊ शकते. त्यामुळे या जीमेलवरील इनबाॅक्स रिकामा करण्यासाठी प्रथम जीमेलच्या शोध बारवर जावे, त्या बारवर टाइप करावे- has:attachment larger:10M येथे तुम्हाला दहा एमबीपेक्षा मोठे असणारे मेल दिसतील. यानंतर ट्रॅश फोल्डरमध्ये जाऊन एम्प्टी ट्रॅशवर क्लिक करावे व ईमेल्स डिलिट करून टाकावे. स्पॅम ईमेल्सदेखील मोठी जागा घेतात. जीमेलवर स्पॅम ईमेल ऑप्शनवर जावे. ‘डिलीट ऑल स्पॅम मॅसेज नाओ’ ऑप्शनवर क्लिक करावे आणि आणि ईमेल्स डिलीट करावे.