Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Penalty on 7 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्यांना सेबीचा दणका, 7 संस्थांना 35 लाखांचा दंड

SEBI Penalty on 7 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्यांना सेबीचा दणका, 7 संस्थांना 35 लाखांचा दंड

SEBI Penalty on 7 entities : नियमांना धरून ट्रेडिंग न करणाऱ्या संस्थांना सेबीनं दणका दिलाय. चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या जवळपास 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावलाय. अनुचित व्यवहाराचा ठपका ठेवत 35 लाख रुपयांचा हा दंड आकारण्यात आला आहे.

भांडवली बाजार नियामक सेबी (Securities and Exchange Board of India) ही सरकारची संस्था भांडवली बाजार नियमन करणारी संस्था आहे. या विभागात कोणताही अनुचित प्रकार झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार सेबीला आहे. अशीच 7 संस्थांवर सेबीनं दंडात्मक कारवाई (Penalty) केलीय. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधल्या ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्स या सेगमेंटमध्ये अयोग्य ट्रेडिंग झालं. या कारणावरून सेबीनं या संस्थांना 35 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. पवन कुमार सारवगी HUF, शुभ लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, एसटीआयसी ट्रेडकॉम (STIC Tradecomm), स्टारलाइट डेव्हकॉन (Starlight Devcon), देवेश कॉमोसेल (Devesh Commosale), देविंदर कुमार आणि किशोरचंद्र गुलाबभाई देसाई अशा विविध 7 ट्रेडिंग संस्थांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनी कंट्रोलनं यासंबंधीचं वृत्त दिलंय.

काही संस्थांचे तपासले व्यवहार

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (SEBI) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्सच्या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात उलटसुलट व्यवहार आढळून आले. याचा परिणाम असा, की स्टॉक एक्स्चेंजमध्ये कृत्रिम व्हॉल्यूम तयार झाले. एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 यादरम्यान सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या या विभागातले काही संस्थांचे व्यवहार तपासले. त्यानंतर हा प्रकार आढळून आलाय.

उलटसुलट व्यवहार दाखवले जातात नियमित

उलटसुलट व्यवहार नियमित व्यवहारांप्रमाणे चालवले जातात. हे बेकायदेशीर आहे. सेबीला अशाप्रकारे बेकायदा व्यवहार करणाऱ्या 7 संस्था आढळून आल्या. त्यानंतर सेबीनं दंडाचा आदेश काढला. या आदेशात सेबीनं म्हटलं, की कृत्रिम व्हॉल्यूम निर्मितीच्या वेळी ट्रेडिंगच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतींचा वापर केला जातो. या संस्थांनी याच पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी पीएफयूटीपीच्या (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices) नियमांचं उल्लंघन केल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय.

एंजल ब्रोकिंगलाही ठोठावला दंड

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं या सात संस्थांना दंड ठोठावला मात्र त्याआधी 8 दिवसांपूर्वी एका एंजल ब्रोकिंगलाही दंड ठोठावला. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड आहे. या एंजल ब्रोकिंगनं नियामक नियमांचं उल्लंघन केल्याचं सेबीनं म्हटलंय. एंजेल ब्रोकिंग (एंजल वन लिमिटेड) सेबी नोंदणीकृत स्टॉक आणि कमोडिटी ब्रोकर आहे. त्याचप्रमाणे ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरदेखील (NSE) लिस्टेड आहे. मात्र गैरव्यवहार केल्यानं सेबीनं यावर कारवाई केलीय. 

कशी केली एंजल ब्रोकिंगवर कारवाई?

एंजल ब्रोकिंग लिमिटेडसंदर्भात सेब, स्टॉक एक्स्चेंज आणि ठेवीदार यांच्यातर्फे संयुक्तपणे तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सेबीनं या कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यासंदर्भात सेबीनं 78 पानांचा आदेश जारी केला होता. ज्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये क्रेडिट शिल्लक आहे, त्यांच्या सिक्युरिटीज एबीएलनं (एंजल ब्रोकिंग लिमिटेड) तारण ठेवल्या. कंपनीनं ग्राहकांच्या जवळपास 32.97 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचं सेबीला आढळलं. एवढंच नाही, तर 300 केसेसमध्ये तपासणीच्या दरम्यान निष्क्रिय ग्राहकांच्या निधीची पूर्ततादेखील कंपनीनं केली नाही. 43.96 लाख रुपये नॉन सेटल केले गेले, असंही सेबीनं म्हटलं आहे.