Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sebi AMC Surveillance: म्युच्युअल फंडातील गैरप्रकार टाळण्यासाठी सेबीचा प्रस्ताव; AMC, कर्मचारी अन् ब्रोकर्सवर राहणार नजर

SEBI

म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Sebi AMC Surveillance: म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारात भारतीय नागरिकांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर फसवणूक, अनियमितता, गुंतवणुकदारांच्या पैशांचा गैरवापरही वाढत आहे. त्यामुळे आता सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) स्तरावर निगराणी व्यवस्था (surveillance systems) उभी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागितल्या आहेत.

सेबीकडे या संदर्भात सर्वसामान्य नागरिक आणि इतर संबंधित यंत्रणा सूचना आणि मते मांडू शकतात. 8 जूनपर्यंत सूचना मांडण्यास वेळ दिला आहे. त्यानंतर या प्रस्तावावर विचार केला जाईल. घोटाळे रोखण्यासाठी संस्थात्मक स्वरुपाची व्यवस्था उभी करण्यासाठी सेबी आग्रही आहे.

भांडवली बाजारातील घोटाळे

मागील काही वर्षात अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनीही अनेक घोटाळे केल्याचे समोर आले आहे. तसेच गुंतवणूकदारांची माहितीही लिक झाली. चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना योजना विकणे, फ्रंड रनिंग, इंसायडर ट्रेडिंगचेही अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे या सर्व प्रकारांसाठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील वरिष्ठ अधिकारी जबाबदार असतील, असे सेबीने या प्रस्तावत म्हटले आहे. फंड व्यवस्थापन कंपनीतील कर्मचारी, त्यांचे ब्रोकर्स, डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर्सवरही या नव्या निगराणी व्यवस्थेद्वारे नजर ठेवण्यात येईल. 

अॅक्सिस बँक आणि एलआयसी प्रकरणानंतर सेबीचे पाऊल

भविष्यात एखादी कंपनी काय निर्णय घेणार किंवा कोणते व्यवहार करणार आहे. त्या कंपनीतील संवेदनशील माहितीच्या आधारे आधीच ट्रेडिंग करणे यास फ्रँट रनिंग असे म्हणतात. इंनसाइडर ट्रेडिंगही असाच प्रकार आहे. अॅक्सिस बँक एएमसी आणि एलआयसीमध्ये फ्रँट रनिंग चा प्रकार उघडकीस आला होता. कंपनीतील कर्मचारी, ब्रोकर्स, डिलर्स यांचा यात समावेश आढळून आला. त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडू नये त्यासाठी सेबी निगराणी व्यवस्था निर्माण करणार आहे.

कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींमधील संपर्क आणि मेल व्यवहार यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर काही घोटाळा आढळून आला तर काय कारवाई करायची याबाबत प्रस्तावात तरतूदी करण्यात आल्या आहेत. सेबीच्या या प्रस्तावावर सर्वसामान्य नागरिकही सूचना करू शकतात.