Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विदेशी गुंतवणूकदारांना कमोडिटी मार्केटमध्ये व्यापार करण्यास सेबीकडून परवानगी

sebi

सेबीने (SEBI) एफपीआयला (FPI) सर्व नॉन-अ‍ॅग्रीकल्चर डेरिव्हेटिव्ह आणि निवडक नॉन-अ‍ॅग्रीकल्चर बेंचमार्क निर्देशांकांमध्ये व्यापार करण्याची परवानगी (SEBI FPI Regulations) दिली आहे.

सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने बुधवारी (दि. 29 जून) विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (Foreign Portfolio Investors-FPI) एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली. एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे मार्केटमधील लिक्विडिटी वाढेल आणि शेअर्सच्या किमतींचीही मागणी वाढेल, असे सेबीने म्हटले.

सेबीने (SEBI) विदेशी गुंतवणूकदारांना (FPI) एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी मार्केटमध्ये भाग घेण्यास परवानगी देताना, एफपीआयला (FPI) सर्व नॉन-अ‍ॅग्रीकल्चर डेरिव्हेटिव्ह आणि निवडक नॉन-अ‍ॅग्रीकल्चर बेंचमार्क निर्देशांकांमध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच सुरूवातीला विदेशी गुंतवणूकदार फक्त कॅश-सेटल कॉन्ट्रॅक्टमध्येच ट्रेडिंग करू शकणार आहेत. सध्या कच्चे तेल (Crude Oil), नैसर्गिक वायू (Natural Gas) आणि निर्देशांक (Indices) रोखीने स्थिरावले आहेत; त्याचबरोबर व्यापार्‍यांनी सेटलमेंटचा भाग म्हणून कमॉडिटीज वितरीत केल्या पाहिजेत, असं सेबीने म्हटले आहे.

इंडियन शेअर मार्केट स्टेबल होण्यास मदत

सेबीने (SEBI) विदेशी गुंतवणूकदारांना (FPI) कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिल्याने भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा व्हॉल्यूम वाढेल. एकूण मार्केटमधील गुंतवणुकीचा व्हॉल्यूम वाढल्यामुळे मार्केटमध्ये एक मॅच्युरिटीचे वातावरण निर्माण होईल. परिणामी जे विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करत आहेत. त्याला आळा बसेल आणि एकूणच यामुळे शेअर मार्केटमध्ये होत असलेली घसरण थांबून इंडियन शेअर मार्क्ट स्टेबल होण्यास मदत होईल.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढेल!

विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर मार्केटमधील सहभागामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. सध्या अल्गोरिदम तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही याचा वापर होण्यास मदत होईल आणि अर्थात त्याचा फायदा विदेशी गुंतवणूकदारांबरोबर भारतीय गुंतवणूकदारांनाही होईल.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस कमोडिटीज अ‍ॅण्ड करन्सीजचे प्रमुख किशोर नारणे (Kishor Narne, commodities and currencies, Motilal Oswal Financial Services) सांगतात की, सेबीने जरी विदेशी गुंतवणूकदारांना सध्या फक्त बिगरशेती आणि रोखीने सेटल केलेल्या करारांपुरताच सहभाग मर्यादित केलेला असला तरी, भारतीय बाजारपेठेचा विस्तार करण्याच्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल ठरू शकते. भारत आर्थिकदृष्ट्या हळुहळू विकसित होत आहे; त्याचप्रमाणे आपल्या कमोडिटी मार्केटला जागतिक बाजारपेठेशी जोडणे महत्त्वाचे आहे. हे पाऊल म्हणजे भांडवलाचा मुक्त प्रवाह आणि मार्केटमधील लिक्विडिटी वाढण्यास मदत होईल. तसेच विदेशी गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंगमुळे इथल्या किमतीतील गॅप कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, सेबी (SEBI) याच्या अंमलबजावणीची तारीख परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करणार आहे. सेबी, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्याशी चर्च करून आयटीशी संबंधित पायाभूत सुविधांबाबतही आऊटसोर्सिंग करणाऱ्या कराराचे पुनरावलोकन करणार आहे.

image source - https://bit.ly/3ywf3ce