SBI कार्ड आणि नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) SBI क्रेडिट कार्ड RuPay प्लॅटफाॅर्मवर UPI सोबत लिंक करण्याची घोषणा 10 ऑगस्ट 2023 रोजी केली. यामुळे SBI चे ग्राहक RuPay क्रेडिट कार्डद्वारे UPI वरून पेमेंट करू शकणार आहेत. या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे क्रेडिट कार्ड थर्ड-पार्टी UPI अॅपशी लिंक करावे लागणार आहे. त्यानंतरच ग्राहक ही सुविधा वापरू शकणार आहेत.
SBI कार्ड ग्राहक UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी SBI कार्डने जारी केलेले RuPay क्रेडिट कार्ड वापरू शकणार आहेत. आज UPI सर्वांत मोठे डिजिटल प्लॅटफाॅर्म बनले असून यावर रोजच लाखो व्यवहार होतात. यामुळे आमच्या ग्राहकांना टेन्शन-मुक्त वापरासह अधिक सुलभता आणि जलद व्यवहार अनुभवता येणार आहे. तसेच, येत्या काही दिवसात इंडस्ट्रीला क्रेडिट कार्डची होत असलेली लक्षणीय वाढ पाहायला मिळणार असल्याचे SBI कार्डचे MD व CEO रामा मोहन राव अमारा यांनी सांगितले आहे.
SBI Card customers can now link their RuPay Credit Card with any UPI-enabled app and make easy and safe credit-based UPI transactions.
— NPCI (@NPCI_NPCI) August 10, 2023
To know more, visit: https://t.co/DCrCEEXpof@SBICard_Connect @RuPay_npci#NPCI #RuPay #SBICard #UPI #AskForRuPayCredit #RuPayCreditCardOnUPI pic.twitter.com/YyfgE9Tx4C
UPI वर SBI RuPay क्रेडिट कार्ड कनेक्ट करणे हा भारतीय डिजिटल पेमेंटच्या वृद्धीच्या मार्गातील मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. या पार्टनशीपमुळे SBI RuPay क्रेडिट कार्डधारकांना विना अडथळा UPI पेमेंट करता येणार आहेत, यामुळे त्यांना डिजिटली क्रेडिट कार्डचा अनुभव घेता येणार आहे. NPCI चे MD व CEO दिलीप आसबे यांनी म्हटले आहे की, देशात वाढत्या क्रेडिट कार्डच्या मागणीसह, RuPay क्रेडिट कार्डला UPI सोबत जोडण्यासारखे नवे पेमेंट सोल्युशन तयार करणे आवश्यक आहे, जे सहज, जलद आणि सुरक्षित आहेत.
कार्ड धारक त्यांचे सुरू असलेले क्रेडिट कार्ड UPI वर नोंदवू शकतात आणि त्या कार्डचा वापर करून मर्चंट्सना (P2M व्यवहार) पेमेंट करू शकतात. तसेच, ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत आहे. UPI शी क्रेडिट कार्ड लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी, SBI कार्डमध्ये नोंदणीकृत कार्ड धारकाचा मोबाईल नंबर UPI शी लिंक असणे गरजेचे आहे. सध्या ग्राहक BHIM, Mobikwik, Googlepay, PhonePe आणि Paytm अॅपवर त्यांचे RuPay क्रेडिट कार्ड UPI वर लिंक करू शकतात, तसेच इतरही UPI अॅपवर ही सेवा उपलब्ध आहे.
SBI कार्डचे RuPay क्रेडिट कार्ड असे करा लिंक
- Play/App Store वरून तुम्हाला हवे असलेले UPI थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करा.
- UPI अॅपवर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा आणि नोंदणी पूर्ण करा.
- यशस्वीरित्या नोंदणी झाल्यानंतर, "क्रेडिट कार्ड जोडा/ क्रेडिट कार्ड लिंक करा" हा पर्याय निवडा.
- क्रेडिट कार्ड जारीकर्त्यांच्या लिस्टमधून "SBI क्रेडिट कार्ड" निवडा.
- लिंक करण्यासाठी तुमचे SBI RuPay क्रेडिट कार्ड निवडा.
- सूचित केल्यावर तुमच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि समाप्ती तारीख टाका.