जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये एसबीआयनं (State bank of India) म्हटलं, की स्टेटमेंट सायकलमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन खर्चावर मिळवता येवू शकणारी कमाल कॅशबॅक (Cashback) 5,000 रुपये मर्यादित असणार आहे. यासोबतंच कार्ड दागिने, शाळा आणि शैक्षणिक सेवा, उपयुक्तता, विमा सेवा कार्ड, भेटवस्तू, आठवणीत राहणाऱ्या वस्तूची दुकानं, सदस्य वित्तीय संस्था किंवा अर्ध रोख रक्कम आणि रेल्वे यासारख्या वस्तूंवर कोणताही कॅशबॅक देणार नाही. एसबीआय कार्ड्सनं त्यांच्या वेबसाइटनुसार देशातल्या 21 विमानतळांवर 42 लाउंजसह टाय-अप केलं आहे.
Table of contents [Show]
199 रुपये अधिक कर
स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसनं मार्च महिन्यात एसबीआय क्रेडिट कार्डचं शुल्क आणि फी सुधारित केली. आता नव्या नियमानुसार, जे ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे त्यांचं भाडं भरत होते त्यांच्याकडून 199 रुपये अधिक कर आकारला जाणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसबीआय कार्ड्सनं क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर प्रक्रिया शुल्क 18 टक्के दरानं 99 रुपये अधिक जीएसटी वाढवला.
.@CNBCTV18Live
— Abhishek Kothari ?? (@kothariabhishek) April 6, 2023
No more domestic lounge access for @SBICard_Connect credit card holders; effect from 1st May’23
Alert
From Q1FY21 to Q3FY23:
Margins declined from 19.2% to 11.6%
Revolver rate declined from 45% to 24%
Yield declined from 22.8% to 16.4% pic.twitter.com/jMdpDw4CNa
फेब्रुवारीमध्ये जोडले गेले 3,00,000 नवीन क्रेडिट कार्ड
एसबीआय कार्डच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये सुमारे 3,00,000 नवीन क्रेडिट कार्ड जोडले गेले आहेत, अशी माहिती या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली होती. एसबीआयच्या तुलनेत एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेनं अनुक्रमे 60,000 आणि 80,000 नवे कार्ड जोडले. त्यामुळे या ब्रँडकडे आर्थिक वर्ष 2022-23च्या तिसऱ्या तिमाहीत 15 दशलक्ष कार्ड्सधारक जोडले गेले आहेत.
वाढीची टक्केवारी
याच कालावधीत एसबीआय कार्ड अनुक्रमे 2 टक्क्यांनी वाढले. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक 0.6 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी वाढल्याचं आरबीआयच्या आकडेवारीमध्ये स्पष्ट होतं.
क्रेडिट कार्डावरच्या खर्चात कमालीची घट
मात्र एकूणच क्रेडिट कार्डावरच्या खर्चात कमालीची घट झालीय. दर महिन्याला जवळपास 7 टक्के इतका तो खाली गेला आहे. मागच्या काही तिमाहींमध्ये, एसबीआय कार्डचा रिव्हॉल्व्हर दर आर्थिक वर्ष 21च्या पहिल्या तिमाहीत 45 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत 24 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. निव्वळ व्याजाचं मार्जिनदेखील डिसेंबर 2022च्या तिमाहीत 19.2 टक्के होतं. ते 11.6 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. ही आतापर्यंतची नीचांकी टक्केवारी आहे.
नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस ही एक वेगळी संस्था आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. या संस्थेमार्फत वैयक्तिक कार्डधारक आणि कॉर्पोरेट क्लायंटसाठी मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ ऑफर करते.
काय असतो लाउंज अॅक्सेस?
विमानतळावर असलेली ही एक सुविधा आहे. ही एक शांत आणि आरामदायी जागा आहे. या ठिकाणी मोफत अल्पोपाहार, वायभाय, स्पा, आरामासाठी बेड तसंच आरामदायी आसनव्यवस्थेसह इतर सुविधा विमान प्रवाशास मिळतात. बहुतांशी बिझनेस क्लासमधले प्रवासी याचा लाभ घेतात. यासंदर्भात तुमच्याकडे पास असेल तर इथे तुम्हाला मोफत प्रवेश मिळतो.