Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरधारकांना 30 जूनपूर्वी करावे लागेल 'हे' काम

SBI Bank Locker Update

Image Source : www.theprobe.in

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आणले आहे. हे अपडेट बँकेच्या लॉकरधारकांसाठी आहे. 30 जून 2023 पर्यंत बँकेच्या लॉकरधारकांना बँकेसोबत बँक लॉकर ऍग्रीमेंटची (Bank Locker Agreement) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

देशातील बँका वेगवेगळे दस्ताऐवज, दागिने किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देतात. ज्यामुळे ग्राहकांच्या मालमत्तेचे संरक्षण होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आणले आहे. हे अपडेट बँकेच्या लॉकरधारकांसाठी आहे. बँकेने ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत बँक लॉकर ऍग्रीमेंटची (Bank Locker Agreement) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवाहन केले आहे. यासंदर्भात बँकेने ट्विटरवरून माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे लॉकरधारकांना आवाहन

स्टेस्ट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना विनंती केली आहे की, ग्राहकांनी बँकेच्या ब्रँचला भेट द्या आणि बँक लॉकर ऍग्रीमेंटची प्रक्रिया पूर्ण करून त्यावर सही करा. या ऍग्रीमेंटमध्ये बँक आणि ग्राहक यांच्यातील लॉकर संदर्भातील नियम व अटी नोंदवण्यात आल्या आहेत. तसाच कार्यकाळ देखील नमूद केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉकर संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या ग्राहकांना यापूर्वी 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ दिला होता. ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील ग्राहकांच्या समस्या व बँके संदर्भातील फीडबॅक लक्षात घेऊन बँकांना 1 जानेवारी 2023 पर्यंत लॉकरधारकांसोबत संपर्क साधून लॉकरची ऍग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र याची पूर्तता न झाल्याने आता ही तारीख 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

लॉकर ऍग्रीमेंटसाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा

भारतीय रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की, बहुतांश ग्राहकांनी लॉकर संदर्भातील ऍग्रीमेंटवर सही केलेली नाहीत.  तसेच बँकांनी देखील ग्राहकांना  निश्चित तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवाहन केलेले नाही. हे ऍग्रीमेंट करण्यासाठी स्टॅम्प पेपर (Stamp paper), ई-स्टॅम्पिंग किंवा इलेक्ट्रॉनिक एग्जिक्यूशन पद्धतीचा (e-stamping or electronic execution method) अवलंब करावा असे सांगण्यात आले आहे.

फक्त 'या' वस्तूच लॉकरमध्ये ठेवता येतील

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना बँक लॉकरमध्ये केवळ दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यासारख्या कायदेशीर वैध वस्तू ठेवता येणार आहेत. बँकेसोबतच्या करारात ग्राहकाला कोणत्या प्रकारचा माल ठेवण्याची परवानगी आहे आणि कोणती नाही, या डिटेल्स सांगितल्या जातील. एवढेच नाही तर बँकेचे लॉकर आता फक्त ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जाणार आहेत. ते दुसऱ्याला देता येणार नाही.

अनेक लोक त्यांच्या बँक लॉकरमध्ये अशा वस्तू ठेवतात ज्या कायदेशीर वैध नाहीत. कधीकधी ते हानिकारक देखील असते. आता आरबीआयने हेही स्पष्ट केले आहे की, ग्राहक त्यांच्या लॉकरमध्ये कोणत्या वस्तू ठेवू शकत नाहीत. ग्राहकांना लॉकरमध्ये रोख किंवा विदेशी चलन ठेवता येणार नाही, असे केंद्रीय बँकेकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच शस्त्रे, ड्रग्ज किंवा औषधे (Weapons, Drugs or Medicines) तसेच धोकादायक किंवा विषारी वस्तू ठेवण्यास बंदी असणार आहे.

Source: hindi.moneycontrol.com