Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Satyaprem Ki Katha BO Collection: कार्तिक आणि कियाराची फिल्म गाठेल का 100 कोटींचा टप्पा? जाणून घ्या बजेट आणि कमाईबद्दल

Satyaprem Ki Katha BO Collection

Image Source : timesofindia.indiatimes.com

Satyaprem Ki Katha BO Collection: बॉलिवूड फिल्म 'सत्यप्रेम की कथा'च्या कमाईमध्ये बॉक्स ऑफिसवर घट होताना दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा तरी गाठेल का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या फिल्मने बजेटपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. यानिमित्ताने फिल्मचे बजेट आणि 14 दिवसांची कमाई जाणून घेऊयात.

सध्या बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) ही हिंदी बॉलिवूड फिल्म चालू आहे. ही फिल्म 29 जून 2023 ला संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाली आहे. भूल भुलैय्या 2 नंतर कियारा आणि कार्तिक यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली आहे. ही फिल्म प्रदर्शित होऊन 14 दिवस झाले असले, तरीही या फिल्मने म्हणावी तशी कमाई केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे सत्यप्रेम की कथाने बजेटहून जास्तीची कमाई करण्यात यश मिळवले आहे. मात्र ही फिल्म 100 कोटींचा यशस्वी टप्पा गाठेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या निमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि 14 दिवसांच्या कमाईबद्दल जाणून घेऊयात.

14 दिवसांची कमाई जाणून घ्या

SacNilk च्या महितीनुसार 'सत्यप्रेम की कथा' या फिल्मने 14 दिवसात 70 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. असे असले तरीही फिल्मची दिवसेंदिवस कमाई कमी होताना पाहायला मिळत आहे. 14 व्या दिवशी या फिल्मने 1.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा गल्ला पकडून आत्तापर्यंत फिल्मने 71. 41 कोटी रुपये जमवण्यात यश मिळवले आहे. मात्र दिवसेंदिवस कमी होत असलेल्या कमाईमुळे  चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठू शकेल का? असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घोंघावत आहे.

फिल्मचे बजेट जाणून घ्या

मराठी दिग्दर्शक समिर विद्वंस (Samir Vidwans) यांनी 'सत्यप्रेम की कथा' ही हिंदी फिल्म दिग्दर्शित केली आहे. या फिल्ममध्ये कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) सत्यप्रेमची भूमिका साकारली आहे. तर कथाच्या भूमिकेत कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसून आली आहे. तसेच सुप्रिया पाठक (Supriya Pathak), गजराज राव (Gajraj Rao) आणि सिद्धार्थ रांदेरिया (Siddharth Randeria) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये साकारल्या आहेत. ही फिल्म केवळ 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे. या फिल्मने बजेटपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे म्हणावी तशी कमाई होताना दिसत नाहीये. 

Source: abplive.com