Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saraswat Bank Digital Services: डिजिटल सेवेसाठी सारस्वत बँकेची टॅगिटसोबत भागीदारी

Digital Banking

Saraswat Bank Digital Services: भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी टॅगिट या कंपनीबरोबर करार केला आहे. मोबिक्सचा वापर करत सुरक्षित आणि कोठूनही, चोवीस तास व्यापक डिजीटल सेवा पुरवत आपल्या ग्राहकांचा अनुभव बँकेला उंचावता येणार आहे.

भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी टॅगिट या कंपनीबरोबर करार केला आहे. मोबिक्सचा वापर करत सुरक्षित आणि कोठूनही, चोवीस तास व्यापक डिजीटल सेवा पुरवत आपल्या ग्राहकांचा अनुभव बँकेला उंचावता येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि डिजीटल बँकिंग मंचावर सवोत्तम पर्याय यामुळे बँकेने टॅगिटची निवड केली आहे.

मोबीक्स डिजिटल बँकिंग मंचामुळे नवीन डिजिटल सेवा सुरु करण्याच्या बँकेच्या क्षमतेला वेग मिळणार असून त्यामुळे सतत नाविन्यपूर्ण आणि अधिकाधिक सेवा सुरु करत ग्राहकांची संख्या वाढविता येणार आहे. नवीन डिजिटल सेवांमुळे अधिकाधिक डिजिटल चॅनल्सचा वापर करण्याचा बँकेच्या ग्राहकांचा वेग वाढणार असून त्यामुळे बँकेला स्पर्धेला तोंड देता येईल आणि बाजारपेठेतील आपला हिस्सा देखील वाढविता येणार आहे.

नवीन भागीदारीबाबत बोलताना सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात सारस्वत बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या नवीन अॅप्लिकेशनद्वारे आमच्या ग्राहकांना सर्व चॅनेलयुक्त सुविधा प्रदान करण्यासाठी टॅगिटसोबतची भागीदारी हा असाच एक उपक्रम आहे. या निरंतर वाटचालीमध्ये ग्राहकांना अखंड संपर्क आणि समृध्द अनुभव मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.      

टॅगिटचे सीईओ संदीप बगारिया म्हणाले की, भारतीय बाजारपेठेतील आमचे मजबूत स्थान आणि कौशल्यासह, डिजिटल क्रांतीच्या बरोबरीने वाटचाल करत राहण्यासाठी त्याचबरोबर डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढवण्याचा ध्यास प्रत्यक्षात साकारण्यासाठी बँकेला पाठबळ मिळेल. मोबाईल आणि वेब या दोन प्रकारात नानाविध प्रकारच्या सेवा मोबिक्स मंच बँकेच्या रिटेल आणि व्यावसायिक ग्राहकांना सर्व समावेशक वैशिष्ट्ये, विविध चॅनेल्स आणि बळकट सुरक्षा यासह अखंडपणे प्रदान करणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील विस्तारवाढ, बाजारपेठेत गतिमानता आणि ग्राहकांबरोबर संबंध आणखी दृढ होईल.

विविध पर्यायांची मुख्य वैशिष्ट्ये

1. बहुपर्यायी ऑथेंटिकेशन, बायोमेट्रीक लॉगिन आदींमुळे व्यापक सुरक्षितता प्रदान होते. 
2. रिटेल ग्राहकांना स्वयंनोंदणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक सेवा पातळीवर कामकाजात अधिक क्षमता प्राप्त करण्यात बँकेला मदत 
3. बँकेद्वारे प्रदान केलेल्या सध्याच्या कार्यक्षमतेचा विस्तार करताना ग्राहकांनी डिजिटल चॅनेलचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी पूर्णत: अंगभूत आणि विविध चॅनेल्सचा वापर 
4. ग्राहकांसाठी स्थिर आणि “नियमित कार्यरत” वातावरण 

सारस्वत बँकेला 275 कोटींचा नफा

सारस्वत बँकेने आपले  क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये  विस्तारलेले आहे. बँकेने मार्च 2022 अखेरीस एकूण 71 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून 275.02 कोटींचा निव्वळ नफा झालाआहे. बँकेचे निष्क्रीय मालमत्ता मूल्य (एनपीए) सर्वाधिक अल्प म्हणजेच 0.65% इतके असून व्यवसायाची मजबूत स्थिती त्यातून दिसून येते.