Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Juniper Hotels IPO: हॉटेल व्यवसाय तेजीत! ज्युनिपर हॉटेल्स आणणार 1800 कोटींचा आयपीओ

Juniper Hotels IPO

सराफ आणि हयात ग्रुपच्या मालकीची ज्युनिपर हॉटेल्स ही कंपनी IPO आणण्याच्या तयारीत आहे. भांडवली बाजार नियामकाकडे कंपनीने कागदपत्रे जमा केली असून 1800 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारी आहे. हॉटेल इंडस्ट्रीत सराफ आणि हयात ग्रुप 80 च्या दशकापासून मिळून काम करत आहे.

Juniper Hotels IPO: कोरोनानंतर हॉटेल व्यवसाय आणि सेवा क्षेत्र तेजीत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच यात्रा ऑनलाइन आणि शामी हॉटेल्सचा IPO आला होता. या दोन्ही IPO ला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ज्युनिपर या बड्या हॉटेल कंपनीचा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे. कंपनीने शेअर मार्केट नियामकाकडे Draft Red Herring Prospectus (DRHP) द्वारे कागदपत्रे जमा केली आहे. 

ज्युनिपर हॉटेल्स कंपनीबद्दल

ज्युनिपर हॉटेल्स ही हॉटेल विकासक आणि व्यवस्थापित करणारी सराफ हॉटेल्स ग्रुपची एक महत्त्वाची कंपनी आहे. सराफ ग्रुपचे भारतात आणि नेपाळमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. हयात ग्रुप आणि सराफ ग्रुप यांच्यामध्ये 1985 पासून भागीदारी आहे. राधे श्याम सराफ यांनी 80 च्या दशकात हॉटेल व्यवसायात उडी घेतली असून अनेक आलिशान हॉटेल्स सुरू केले आहेत. 

Yak & Yeti हे नेपाळमधील आलिशान हॉटेल राधे श्याम सराफ यांनी 1974 साली वर्ल्ड बँकेच्या मदतीने सुरू केले. त्यानंतर हयात हॉटेल्स सोबत भागीदारी करून दिल्लीसह प्रमुख शहरात हयात रिजन्सी नावाने हॉटेल्स सुरू केले. सराफ ग्रुपच्या अनेक सहयोगी कंपन्यांद्वारेही भारतात हॉटेल चालवण्यात येतात. त्यापैकी एक कंपनी ज्युनिपर हॉटेल्स आहे.    

1800 कोटींचा IPO आणणार

10 रुपयांच्या दर्शनी मुल्यावर 1800 कोटी रुपयांचे शेअर्स ज्युनिपर कंपनी बाजारात आणणार आहे. ऑफर फॉर सेलचा यात समावेश नाही. म्हणजेच कंपनीचे सध्याचे गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करणार नाहीत. 1800 कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्यात येतील. 

भांडवली बाजारातून IPO द्वारे उभारलेल्या पैशांपैकी 1500 कोटी रुपये कर्ज चुकते करण्यासाठी, प्रि पेमेंट करण्यासाठी तसेच कंपनीच्या सर्वसामान्य खर्चासाठी वापरण्यात येतील. ज्युनिपर हॉटेलमध्ये गुंतवणूक करणारी हयात ही एकमेव कंपनी आहे. सराफ ग्रुप आणि हयात ने मिळून दिल्लीत 1982 साली आलिशान हॉटेल सुरू केले होते. 

ज्युनिपर कंपनीकडे सध्या 7 हॉटेलची मालकी आहे. मिळून 1800 पेक्षा जास्त रुम्स आणि इतर सुविधा कंपनीद्वारे दिल्या जातात. हयात ग्रुपमधील 20% पेक्षा रुम्सची मालकी ज्युनिपरकडे आहे. 2023 आर्थिक वर्षात कंपनीने 827 कोटी रुपये नफा कमावला. कोरोनानंतर सेवा क्षेत्र तेजीत आल्याने हॉटेल उद्योगांनी गुंतवणूक वाढवली आहे.