Apple आणि Samsung या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या रिटेल आउटलेट्ससाठी असलेली स्पर्धा असे सूचित करते की ब्रँड्स यावर्षी हे दोन स्मार्टफोन ब्रॅंडस मार्केटमध्ये एकमेकांना रिटेल बाजारात टक्कर देण्यासाठी तयार आहेत. मागच्या वर्षी घटती मागणी आणि चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतातील शिपमेंटमध्ये 9 टक्क्यांनी घट झाली असली तरीही, Apple आणि Samsung या दोन्ही कंपन्यांनी प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटला 2022 मध्ये फायदा होतांना दिसला आहे.
नवीन सॅमसंग स्टोअर 3,500 स्क्वेअर फूट जागेवर दोन मजल्यांवर पसरलेले आहे आणि ते ग्राहकांसाठी गॅलेक्सी कार्यशाळा, कॉमर्स अॅक्टीव्हीटी आणि सांस्कृतिक परफॉर्मन्स यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन सॅमसंग करेल. बंगळुरूमधील सॅमसंग ऑपेरा हाऊस नंतर स्मार्टफोन व्यवसायातील दिग्गज कंपनीचे हे दुसरे रिटेल स्टोअर आहे, जे तुलनेने खूप मोठे आहे.
ग्राहकाला सॅमसंग ईकोसिस्टिमचा भाग बनवणे
“सॅमसंग डिव्हाइसेसची ग्राहकांमधील लोकप्रियतेचे दर्शन घडवणारे हे उत्तर भारतातील सर्वात मोठा Samsung रिटेल स्टोअर आहे. या नवीन स्टोअरद्वारे, आमचे ध्येय प्रत्येक ग्राहकाला, सॅमसंग ईको सिस्टीम भाग बनवून एक सुखद अनुभव प्रदान करणे हे आहे," असे सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक सुमित वालिया यांनी सांगितले.
रिटेल बाजारात अॅपल आणि सॅमसंग स्पर्धेसाठी सज्ज
दिग्गज टेक कंपनी अॅपल भारतात आपले पहिले फ्लॅगशिप स्टोअर लॉन्च करण्याच्या तयारीत असतांना काही आठवड्यांतच सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे,वृत्तानुसार सॅमसंग या आठवड्यात दोन रिटेल स्टोअरचे उद्घाटन करणार आहे. कोरोना संकटामुळे या स्टोअरचे उद्घाटन भारतात होऊ शकले नाही. मात्र या आठवड्याचा मुहूर्त कंपनी साधणार आहे.
Apple ने देशातील स्टोअरसाठी स्थानिक इच्छुकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या कंपनीने व्यवसाय तज्ञ, तांत्रिक तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, स्टोअर लीडर आणि "जिनियस" यासह 12 नोकऱ्यांच्या (Vacancy) जागा जाहीर केल्या आहेत.