नवीन वर्षात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लॉंच होत आहेत. फेब्रुवारी 2023मध्ये काही मोठे टेक प्लेअर्स आपले फ्लॅगशिप फोन्स घेऊन बाजारपेठेत दाखल होणार आहेत. यात सॅमसंग व वनप्लस अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. उत्तम हार्डवेअर व सॉफ्टवेअर यांसह आगामी काळात हे फोन्स चर्चेचा विषय ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी S23 लाइनअप (Samsung Galaxy S23 lineup)
सॅमसंग कंपनीने पुढील महिन्यात 'गॅलेक्सी अनपॅक' इवेंटच्या (Galexy unpacked event) आयोजनाची घोषणा केली आहे. कोरोना संकटानंतर तीन वर्षात प्रथमच हा इवेंट होत आहे. हा इवेंट 1 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्निया येथे होणार आहे. सॅमसंग यावेळी फ्लॅगशिप s23 लाइनअप सादर करेल. सॅमसंग कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा इवेंट लाईव्ह असेल
शाओमी 13 सिरिज (Xiomi 13 Series)
फोन निर्माती Xiomi कंपनीने मोबाईल वर्ल्ड कॉँग्रेसमध्ये (MWC) जागतिक स्तरावर Xiomi 13 लॉंच करेल असे जाहीर केले आहे. कंपनीने यावेळी Xiomi 13 व Xiomi 13 प्रो हे दोन्ही डीवायसेस बाजारपेठेत लॉंच करणार असल्याची घोषणा देखील केली आहे. फास्ट चार्ज सपोर्ट, Amoled डिस्प्ले व इतर काही महत्वपूर्ण फीचर्ससह लॉंच होणार आहे.
वनप्लस 11 (OnePlus 11)
वनप्लस 7 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील एक कार्यक्रमात भारतात आपला फ्लॅगशिप फोन वनप्लस 11 लॉंच (OnePlus 11 launching Date) करणार आहे. हा फोन यापूर्वी चीनमध्ये लॉंच झालेला आहे. या फोनमध्ये लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन भारतातील ई-कॉमर्स साईटवर 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजेपासून उपलब्ध होईल.