Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung Book3 Launch: सॅमसंगने भारतात लाँच केली Galaxy Book3 सीरिज; कंपनी लॅपटॉप बाजारात पुनरागमनासाठी सज्ज

Samsung Galaxy Book3 Ultra Launch

Image Source : www.zdnet.com

Samsung Galaxy Book3 Ultra Launch: सॅमसंगने स्मार्टफोन सीरिजसोबतच आपली लॅपटॉप सीरीजही लाँच केली आहे. या मालिकेतही, कंपनीने तीन लॅपटॉप केले आहेत – Galaxy Book3 Ultra, Book3 Pro 360 आणि Book3 Pro. शक्तिशाली प्रोसेसर, अॅडव्हान्स रॅम आणि स्टोरेज यासह इतर अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये या तिन्ही डिव्हायसेसमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या लॅपटॉपबद्दल काही खास गोष्टी

सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनसह लॅपटॉपची नवीन मालिका लाँच केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतीय लॅपटॉप बाजारात पुनरागमन केले. या वर्षी कंपनीने तीन नवीन व्हेरियंट सादर केले आहेत. यामध्ये Samsung Galaxy Book3 Ultra, Book3 Pro 360 आणि Book3 Pro यांचा समावेश आहे.

Galaxy Book3 Ultra एक प्रीमियम आणि फ्लॅगशिप दर्जाचे लॅपटॉप आहे. आणि Galaxy Book3 Pro 360 हा 2-इन-1 या रेंजमधील लॅपटॉप आहे, जो एस-पेन सपोर्टसह येतो. तर Galaxy Book3 Pro हल्क आणि क्लॅमशेल डिझाइनसह तयार केला गेलेला लॅपटॉप आहे.

Galaxy Book3 Ultra मध्ये काय खास आहे?

यामध्ये तुम्हाला 16-इंचाची AMOLED स्क्रीन मिळेल. लॅपटॉप विंडोज ११ वर काम करतो. यामध्ये 13th Gen Intel Core i7/Core i9 प्रोसेसरचा पर्याय उपलब्ध असेल. डिव्हाइस NVIDIA ग्राफिक्स कार्डसह येते. लॅपटॉपमध्ये 16GB आणि 32GB रॅमचा पर्याय देण्यात आला आहे.

Galaxy Book 3 Pro चे फीचर्स 

यामध्ये तुम्हाला 14-इंच आणि 16-इंचाची स्क्रीन मिळेल. लॅपटॉपमध्ये AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. डिव्हाइस Windows 11 शी सुसंगत आहे. यात 8GB/16GB/32GB रॅम आणि 256GB/512GB/1TB SSD स्टोरेज पर्याय मिळेल. यामध्ये 13th Gen Intel Core i5/Core i7 प्रोसेसरचा पर्याय देण्यात आला आहे. याला दोन बॅटरी आकारांसह 67W चार्जिंग मिळते - 63Wh आणि 76Wh. लॅपटॉप फिंगरप्रिंट सुरक्षा आणि सुरक्षित-कोर पीसीसह येतो.

Galaxy Book3 Pro 360 टच स्क्रीन सपोर्टसह उपलब्ध

या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 16-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन टच आणि एस-पेन सपोर्टसह येते. यामध्ये तुम्हाला 13th Gen Intel Core i5/Core i7 प्रोसेसरचा पर्यायही मिळेल. डिव्हाइस Windows 11 शी सुसंगत आहे. यात 8GB/16GB/32GB रॅम आणि 256GB/512GB/1TB SSD स्टोरेज आहे. लॅपटॉप 76Wh बॅटरी आणि 65W चार्जिंग सपोर्टसह येतो. यामध्ये फिंगरप्रिंट लॉक आणि इतर फीचर्स उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy Book3 या लॅपटॉपची किंमत  

जागतिक बाजारात Galaxy Book 3 Ultra या लॅपटॉपची किंमत 2,199 डॉलर्स (सुमारे 1,80,200 रुपये) इतकी आहे. 14 फेब्रुवारीपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हे लॅपटॉप प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल.तसेच Galexy Book3 Pro 360ची किंमत 1,399 डॉलर्स (सुमारे 1,14,700) इतकी असेल.