सॅमसंग मोबाईल कंपनी आज Samsung Galaxy M34 हा स्वस्तात मस्त फीचर्स उपलब्ध करून देणारा मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. मोबाईल लॉन्च होण्याची घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम Amazon India वर हा मोबाईल लिस्ट करण्यात आला आहे. मात्र या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे सॅमसंगकडून मात्र जाहीर झालेले नाही. कंपनीने सध्या केवळ त्याचे फीचर्स जाहीर केले आहेत. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन्स.
स्मार्टफोनची किंमत कंपनीने जाहीर केली नसली तरी त्यांचे आधीचे मॉडेल्स आणि फीचर्स लक्षात घेता Samsung Galaxy M34 हा मोबाईल 18 ते 19,000 रुपयांच्या दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल असा अंदाज आहे. मागील वर्षी कंपनीने Galaxy M33 हा स्मार्टफोन 18,000 रुपयांत विक्रीसाठी आणला अहोता.
स्पेसिफिकेशन काय?
Samsung Galaxy M33 च्या तुलनेत लॉन्च होणाऱ्या Samsung Galaxy M34 मध्ये अधिक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. या मोबाईलमध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले ग्राहकांना अनुभवता येणार आहे. तसेच फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफीची आवड असलेल्या युजर्सला 50MP चा हाय रिजोल्यूशनचा कॅमेरा वापरता येणार आहे. तसेच बॅटरीच्या बाबत बोलायचं झालं तर यात 6,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह ही बॅटरी दिली जाणार आहे.
What should be the Samsung Galaxy M34 5G price in India? pic.twitter.com/03hQTBhvRV
— mysmartprice (@mysmartprice) June 27, 2023
ॲडव्हान्स्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
या मोबाईलचे आणखी एक खास फिचर म्हणजे यात ॲडव्हान्स्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरण्यात आले आहे. याद्वारे फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफी करताना परिसरानुसार फिल्टर वापरता येणार आहेत. तसेच नाईट मोडमध्ये देखील युजर्सला मॉन्स्टर शॉटचा अनुभव घेता येणार आहे.
कुठे खरेदी करू शकता?
तुम्ही देखील हा बेस्ट फीचर्स असलेला मोबाईल खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही Samsung.com किंवा Amazon वरून हा मोबाईल खरेदी करू शकता. सध्या तीन रंगात हा मोबाईल उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्राहकांचा त्यांच्या आवडीनुसार मिडनाईट ब्लू, वॉटरफॉल ब्लू आणि प्रिझम सिल्व्हर हे रंग निवडता येणार आहेत.