नामांकित मोबाईल डिव्हाईस कंपनी सॅमसंगने भारतीय युजर्ससाठी नवीन स्मार्टफोन मंगळवारी (6 जून 2023) लॉन्च केला. कंपनीचा Samsung Galaxy F54 5G हा स्मार्टफोन गॅलेक्सी एफ सिरीजमधील प्रीमियम फोन आहे. हा मोबाईल फोन 5G असून 6000mAh बॅटरी क्षमतेसह ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. सध्या या फोनची प्री-ऑर्डर कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून (Flipkart) करण्यात येत आहे. ज्यामध्ये लॉन्च ऑफरचा लाभ घेतल्यानंतर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. या निमित्ताने या फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.
फीचर्स जाणून घ्या
Samsung Galaxy F54 5G हा नवीन स्मार्टफोन Exynos 1380 5nm प्रोसेसरसह मिळणार आहे. यामध्ये 6.7 इंचाचा एमोलेड (AMOLED) डिस्प्ले देण्यात आला आहे.
कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. Meteor Blue आणि Stardust Silver हे आकर्षक रंग यामध्ये मिळणार आहेत.
या फोनची बॅटरी क्षमता 6000mAh इतकी असून याला चार्ज करण्यासाठी 25W चे सुपरफास्ट चार्जिंग फिचर देण्यात आले आहे.
Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे स्टोरेज मायक्रो एसएसडीच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला असून गॅलक्सी एफ 54 ड्यूअल स्पीकर देखील देण्यात आला आहे. फोनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 देण्यात आली आहे.
Samsung Galaxy F54 5G मध्ये 8MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP ची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy F54 5G फोनची किंमत जाणून घ्या
Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोनला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ग्राहकांना 29,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र Samsung Galaxy F54 5G लॉन्च ऑफर अंतर्गत तो 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. याचा अर्थ ग्राहकांना 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. ग्राहक 6 जूनच्या दुपारपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून या फोनची प्री-ऑर्डर करू शकतात.
Source: jansatta.com