इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंग 18 जानेवारीला भारतामध्ये गॅलेक्सी A series मधील मोबाईल फोन लाँच करणार आहे. A सिरीजमधील नक्की कोणते मोबाइल लाँच केले जातील याबाबत कंपनीने माहिती दिली नाही. 18 तारखेला दुपारी बारा वाजता मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे. A सिरिजमधील मोबाईल, ब्लॅक, बरंगडी, आणि ग्रीन कलरमध्ये देण्यात आले आहेत.
A सिरिजमधील मोबाइल फोनसाठी 6.6 इंच फुल एचडी डिसप्ले देण्यात आला आहे. तर 120Hz रिफ्रेश रेट असेल. A सिरिजमधील मोबाईलला 2 दिवस पुरेल इतका बॅटरी बॅकअप असणार आहे. तसेच यामध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे. 5G नेटवर्कचा अॅक्सेसही या मोबाईलद्वारे घेता येणार आहे.
Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G हे मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच Galaxy A74 5G हा फोनही भारतामध्ये लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल सिरिजमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाइझेशन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीने नुकतेच अमेरिकेमध्ये गॅलेक्सी A14 5G हे मॉडेल लाँच केले. यामध्ये 90Hz डिसप्ले देण्यात आला आहे. मात्र, A सिरिजमधील हे मॉडेल भारतामध्ये लाँच होईल की नाही? याबाबत कंपनीने अधिक माहिती दिली नाही.