स्मार्टफोन्स उत्पादनातील आघाडीची कंपनी सॅमंसगने एकाच दिवशी 1400 कोटींचे मोबाइल विक्री करण्याचा पराक्रम केला आहे. सॅमसंग गॅलक्सी एस 23 या बहुचर्चित स्मार्टफोन्सच्या प्री बुकिंगसाठी ग्राहकांनी अक्षरश: झुंबड केली आहे.(Samsung Galaxy S23 Record Pre Booking)पहिल्याच दिवशी 1 लाख 40 हजार मोबाईल्सची बुकिंग झाली असून कंपनीने जबरदस्त कमाई केली आहे.
सॅमसंग गॅलक्सी एस 23 ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. ग्राहकांना 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत या फोनसाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरुन सॅमसंग गॅलक्सी एस 23 ची प्री-बुकिंग करता येईल.
सॅमसंग गॅलक्सी एस 23 ची प्री-बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी 1.4 लाख फोन्सची बुकिंग झाली असल्याची माहिती सॅमसंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुलान यांनी सांगितले. ते म्हणाले मागील 24 तासांत सॅमसंग गॅलक्सी एस 23 ला प्रचंड मागणी असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. सॅमसंग गॅलक्सी एस 22 च्या तुलनेत सॅमसंग गॅलक्सी एस 23 च्या प्री-बुकिंगला दुप्पट प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सॅमसंग गॅलक्सी एस 23 ची किंमत 75000 ते 155000 रुपये या दरम्यान आहे. हा फोन भारतातच तयार करण्यात येणार आहे. सॅमसंगच्या नोएडामधील प्रकल्पात सॅमसंग गॅलक्सी एस 23 ची निर्मिती होणार आहे. गॅलक्सी 22 अल्ट्राच्या तुलनेत गॅलक्सी एस 23 ची किंमत 2.7% ते 3% जास्त आहे.
पॉवरफुल कॅमेरा गॅलक्सी एस 23 ची खास गोष्ट
सॅमसंग गॅलक्सी एस 23 मध्ये पाच कॅमेरे असून या कॅमेऱ्यांची सेन्सॉर रेंज 12 मेगापिक्सल ते 200 मेगापिक्सल आहे. कॅमेरा सेन्सॉरमुळे सॅमसंग गॅलक्सी एस 23 हा आजवरचा सर्वात पॉवरफुल कॅमरा असलेला स्मार्टफोन ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. सॅमसंग गॅलक्सी एस 23 मध्ये उच्च क्षमतेचा स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 मोबाईल प्लॅटफॉर्म आहे.