Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung Credit Card: जाणून घ्या अर्ज कसा करायचा आणि त्याचे फायदे!

Samsung Axis Credit Card

Image Source : samsung.com

सॅमसंगने अक्सिस बॅंकेशी टायअप करून सॅमसंग अॅक्सिस क्रेडिट कार्ड (Samsun Axis Credit Card) लॉन्च केले. चला तर मग जाणून घेऊयात या कार्डवर तुम्हाला कोणते फायदे आणि ऑफर मिळू शकतात.

सॅमसंग या जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने एक नवीन प्रॉडक्ट लॅन्च केले आहे. पण यावेळी हा कुठला स्मार्टफोन, टीव्ही, टॅबलेट किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही. तर दक्षिण कोरियाच्या या दिग्गज कंपनीने म्हणजेच सॅमसंगने अक्सिस बॅंक आणि व्हिसा कार्डच्या मदतीने सॅमसंग अॅक्सिस क्रेडिट कार्ड (Samsung axis credit card) लॉन्च केले.

सॅमसंग क्रेडिट कार्डचे फायदे आणि ऑफर!

सॅमसंग क्रेडिट कार्ड दोन प्रकारचे आहे. व्हिसा सिग्नेचर (Visa Signature) आणि व्हिसा इनफिनिट (Visa Infinite). या दोन्ही कार्ड्सची रचना प्लास्टिकची आहे. व्हिसा सिग्नेचर (Visa Signature) आणि व्हिसा इनफिनिट (Visa Infinite) या दोन्ही कार्डची ऑफर आणि वार्षिक फी वेगवेगळी आहे. सिग्नेचर कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. त्यात इतर टॅक्सचाही समावेश आहे. जर तुमचा वार्षिक खर्च 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर वार्षिक फी माफ केली जाते. 


दुसरीकडे, इनफिनिट कार्डची वार्षिक फी 5,000 आहे. परंतु तुमचा वार्षिक खर्च 7,00,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, वार्षिक फी माफ केली जाते. सिग्नेचर क्रेडिट कार्ड बहुतेक लोकांसाठी महत्त्वाचे आणि वापरण्यास सोईस्कर आहे. कारण हे कार्ड अनेक ऑफरसह येते. इनफिनिट कार्डचे फायदे उत्तम आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील EDGE रिवॉर्ड पॉइंट्स, त्या नंतर मोठ्या किमतीचे गिफ्ट या कार्डवर मिळू शकतात. 

सर्वात आधी कॅशबॅक ऑफर येतो. कार्डधारक सॅमसंग प्रॉडक्ट आणि सेवांसाठी सर्व ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर 10 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळतो. कॅशबॅकची मर्यादा सिग्नेचर कार्ड धारकांसाठी 2,500 रुपये मासिक आणि 10,000 रुपये वार्षिक आहे. दुसरीकडे इनफिनिट कार्ड धारकांसाठी कॅशबॅकची मर्यादा मासिक 5,000 रुपये आणि वार्षिक 20,000 रुपये आहे. जर तुम्ही सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असाल तर ही अत्यंत आनंदाची बाब आहे. 

कार्डधारकांना सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खर्चावर 5 EDGE रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील आणि सिग्नेचर कार्डसह निवडक भागीदारांकडून 10 पॉइट्स मिळतील. दुसरीकडे, इनफिनिट कार्डधारकांना देशांतर्गत व्यवहारासाठी 5 पॉइट्स , आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी 15 पॉइट्स आणि निवडक भागीदारांकडून 15 पॉइट्स मिळतील. 5 EDGE रिवॉर्ड पॉइंट्स 1रूपयाच्या बरोबरीचे आहेत.

Cash back-Samsung Axis bank credit card

तुम्ही हे कार्ड शॉपिंग, जेवण ऑर्डर करणे, तिकिटे बूक करणे इत्यादि साठी वापरू शकता. रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकता जे नंतर रिडीम केले जातात. याशिवाय कार्डधारकांना सॅमसंग क्रेडिट कार्डसह एअरपोर्ट लाउंजमध्ये देखील एंट्री मिळते. सिग्नेचर कार्डधारक लाउंजला वर्षाला 4 भेटी देऊ शकतात. इतकेच नाही तर प्रति स्टेटमेंट 500 रुपयांपर्यंत 1 टक्के (Fuel charges)इंधन शुल्क माफ आहे. वेलकम पॉइट्स म्हणून सिग्नेचर कार्डधारकांसाठी 500 रुपये किमतीचे 2,500 EDGE रिवॉर्ड पॉइंट्स आहेत. तर Infinite कार्डधारकांना 6,000 रुपयांचे 30,000 EDGE रिवॉर्ड पॉइंट मिळतील.

कार्डसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वरून  सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज (Samsung axis bank credit card apply) करू शकता. सर्व ऑफर आणि फायदे सुद्धा त्यावर जाणून घेऊ शकता. तुम्ही सॅमसंग शॉप अॅपद्वारे देखील कार्डसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन शॉपिंग, ऑफलाइन शॉपिंग, रेस्टॉरंटची बिले भरणे, माझ्या कारच्या इंधनाचे पैसे भरणे आणि बरेच काही यासह जवळपास सर्व गोष्टींसाठी क्रेडिट कार्ड वापरले जाते. 

आता वाजवी दरात व्हिसा सिग्नेचर कार्ड उपलब्ध आहे. जर तुम्ही वार्षिक 2,00,000 रुपये खर्च केला नाही तर, कार्डची वार्षिक फी फक्त 500 रुपये असेल. व्हिसा इनफिनिट कार्ड देखील सोईस्कर आहे आंतरराष्ट्रीय सहली करणाऱ्याला EDGE रिवॉर्ड पॉइंट्सच्या रूपात या कार्डचा खूप फायदा होतो. वार्षिक शुल्क जास्त आहे, परंतु फायदे देखील खूप आहेत.