Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme Narzo 60 5G Series मोबाईलची आजपासून विक्री सुरु, ऑफर्स आणि स्पेशिफिकेशन बघाच…

Realme Narzo 60

Realme Narzo 60 सिरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन खास फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. सामान्य ग्राहकांना परवडतील अशा स्वस्त दरात आणि बेस्ट फीचर्ससह हा मोबाईल आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या या मोबाईलचे स्पेशल स्पेशिफिकेशन...

अलीकडेच Realme ने तिची Narzo 60 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये Realme Narjo 60 आणि Realme Narjo 60 Pro 5G या दोन मॉडेलचा समावेश आहे. सध्या रिअलमी मोबाईलचे चाहते या सिरीजच्या मोबाईलचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Realme Narzo 60 सिरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन खास फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. सामान्य ग्राहकांना परवडतील अशा स्वस्त दरात आणि बेस्ट फीचर्ससह हा मोबाईल आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

जर तुम्हीही खूप दिवसांपासून Realme Narjo 60 किंवा Realme Narjo 60 Pro 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. आजपासून 15 जुलै 2023 पासून हे दोन्ही फोन चांगल्या ऑफर्ससह उपलब्ध करून दिले जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात ऑफर्स आणि किमतीबद्दल सविस्तर…

Realme Narzo 60 5G सिरीज किंमत

Realme Narjo 60 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये इतकी आहे आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तसेच, Realme Narjo 60 Pro 5G च्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. यासोबतच 12GB RAM + 256GB स्टोरेज देणाऱ्या मोबाईलची किंमत 26,999 रुपये तर 12GB RAM + 1TB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.

कुठे खरेदी करता येईल?

Realme Narjo 60 आणि Realme Narjo 60 Pro 5G हे खास फीचर्स असलेले मोबाईल Realme  कंपनीच्या अधिकृत साइटवर खरेदी करता येणार आहे. यासोबतच Amazon वर देखील हे मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असतील. 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ग्राहकांना मोबाईल खरेदी करता येणार आहेत.

Realme Narzo 60 ची वैशिष्ट्ये

या मोबाईलचा डिस्प्ले - 6.43-इंच FHD+ AMOLED (90Hz रिफ्रेश रेट) स्पेसिफिकेशनसह दिला जातो आहे. मुख्य म्हणजे याचा प्रोसेसर MediaTek Dimensity 6020 SoC असून जो युजर्सला उतम अनुभव देणार आहे. मोबाईलची रॅम  8GB पर्यंत उपलब्ध असून स्टोरेजच्या बाबतीत  256GB पर्यंत मोबाईल खरेदी करता येणार आहे. मोबाईलचा मुख्य कॅमेरा 64MP + 2MP असून फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे. याद्वारे व्हिडियोग्राफी आणि फोटोग्राफीचा उत्तम अनुभव युजर्सला घेता येईल. या मोबाईल फोनची बॅटरी  5000mAh असून चार्जिंग सपोर्ट 33W इतका आहे.

Realme Narzo 60 Pro 5G ची वैशिष्ट्ये

या मोबाईलचा डिस्प्ले  6.7-इंच FHD+ AMOLED वक्र (120Hz रिफ्रेश दर) असून प्रोसेसर हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 इतका आहे. या मोबाईलची रॅम 12 LPDDR4X असून स्टोरेज  1TB UFS 2.2 सह दिला जाणार आहे. मुख्य कॅमेरा 100MP + 8MP आणि सेल्फी कॅमेरा 16MP चा असेल. या मोबाईलची बॅटरी  5000mAh असून चार्जिंग सपोर्ट 67W इतका आहे. यात ऑपरेटिंग सिस्टम Android 13.0 देण्यात आली आहे.