Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बापरे! AI Product Manager चे सॅलरी पॅकेज 7 कोटी! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला वाढली मागणी

AI Product Manager

Image Source : www.sortbreak.com

चॅटजीपीटी (ChatGPT), गुगलच्या बार्ड (Google Bard) आणि इतर AI tool मार्केटमध्ये आल्यापासून अनेकांनी याचा विरोध केला आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशनने आणि मनोरंजन उद्योगातील काही संस्था-संघटनांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला विरोध दर्शवला आहे. अशातच नेटफ्लिक्सने AI Product Manager पदासाठी कोटींचे पॅकेज देऊ केले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे काय हे काही वेगळे सांगायची गरज नाहीये. आजकाल सगळेच याबद्दल बोलतायेत. एआय आल्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या जातील, मानवांची जागा मशीन घेणार अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक वेगवेगळे अंदाज लावत आहेत. एआयचा नेमका काय परिणाम होईल हे खरे तर येणाऱ्या काळातच आपल्याला समजणार आहे. परंतु आता सध्या एआयची ओळख असणारे, ज्ञान असणारे कर्मचारी कंपन्यांना हवे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर, त्यातील प्रगत तंत्रज्ञान आजच्या घडीला सगळ्यांचीच गरज बनली आहे. अशातच काही बड्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांना कोटींचे सॅलरी पॅकेज द्यायला तयार आहेत.

कोटींचे सॅलरी पॅकेज

Netflix च्या वेबसाईटवर सध्या काही पदांच्या जाहिराती पब्लिश झाल्या आहेत. कंपनीने टेक्निकल डायरेक्टरची देखील ओपनिंग असल्याचे सांगितले आहे. या पदांसाठी नेटफ्लिक्सकडून वार्षिक 4.5 लाख ते 6.5 लाख डॉलर्स पगाराची ऑफर दिली जात आहे. भारतीय चलनात याचा विचार केल्यास, या पदासाठी कर्मचाऱ्यांना 3.70 कोटी ते 5.35 कोटी रुपये पगार दिला जाणार आहे.

एआय प्रॉडक्ट मॅनेजर (AI Product Manager)

नेटफ्लिक्सच्या या जॉबबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. नेटफ्लिक्सने एआय प्रोडक्ट मॅनेजरच्या पदासाठी 9 लाख डॉलर्स पर्यंत वार्षिक पगार देऊ केला आहे. भारतीय चलनात याचा विचार केल्यास या पदासाठी नेटफ्लिक्स तब्बल 7.4 कोटी रुपये इतका प्रचंड पगार देणार आहे. या पदासाठी अप्लाय करणाऱ्या कर्मचाऱ्यास मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये (Machine Learning Platform) सुधारणा करणे आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून ग्राहकांच्या आवडी निवडीचा कंटेट पुरविणे आणि तयार करून घेणे हे काम असणार आहे.

अनेकांचा विरोध 

चॅटजीपीटी (ChatGPT), गुगलच्या बार्ड (Google Bard) आणि इतर AI tool मार्केटमध्ये आल्यापासून अनेकांनी याचा विरोध केला आहे.  हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशनने आणि मनोरंजन उद्योगातील काही संस्था-संघटनांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला विरोध दर्शवला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मनोरंजन कंटेट बनवल्यास मानवी कल्पकतेला आणि सृजनशीलतेला महत्व दिले जाणार नाही अशी भीती कलाकारांनी व्यक्त केली आहे.