Increment Days: सध्या कित्येक आयटी कंपन्यामध्ये पगार वाढ म्हणजेच इंक्रीमेंटचे (पगारवाढ) दिवस सुरू आहेत. वर्षभर केलेल्या कामाची मेहनत, आता रंग आणणार या विचाराने प्रत्येक जण इंक्रीमेंट फॉर्म (Increment Form) भरण्याच्या तयारीत आहे. मात्र इतकं करून ही पगार वाढ झाली नाही, तर निराशाजनक स्थिती येते. हीच स्थिती टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला पगार वाढ होण्यासाठी एचआरशी (HR) कसे बोलायचे, नेमके काय संवाद साधायचा याविषयी काही सल्ले देणार आहोत, हे थोडक्यात जाणून घ्या.
Table of contents [Show]
राजीनाम्याचा विचार करू नये (Do not think of Resignation)
पगारवाढ नाही झाली, तर बरेच जण प्रथम राजीनामा देण्याच्या तयारीत असतात. मात्र हा विचार मनातून पहिला काढून टाका. पहिल्यांदा तुमच्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी एचआरशी संवाद साधा, चर्चा करा. त्यांना विचारा तुम्ही पगार वाढविण्यास तयार आहात का? जर तुम्हाला पाहिजे तितकी पगारवाढ देण्यास कंपनी तयार असेल, तर तुम्हाला पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही.
पगारवाढ अंदाज (Salary Increase Forecast)
तुम्हाला किती पगार वाढवून घ्यायचा हे थेट तुम्ही एचआरशी बोलू नका. तत्पूर्वी तुम्हाला दिलेले काम व जबाबदाऱ्या याचा आवाका समजावून घ्या. मग त्या कामानुसार पगारवाढ करून घ्या. म्हणजेच तुमच्या पगारवाढीचा एक अंदाज एचआरला सांगा.
कामाचे स्पष्टीकरण द्या (Explain the Work)
तुम्ही वर्षभरात किती काम केले आहे, याचे स्पष्टीकरण तुमच्या एचआरला द्या. साधारण पुरावा म्हणून तुम्ही वर्षभरात काम केल्याचा डाटा किंवा रिपोर्ट तुमच्याकडे असेल, तर तो त्यांच्यासमोर सादर करा. तुमच्या कामाचा कंपनीला कसा फायदा झाला हे त्यांना पटवून द्या. जेणेकरून तुमच्या पगारात वाढ होईन.
आत्मविश्वासाने बोला (Speak with Confidence)
पगार ही तुमच्या हक्काची गोष्ट आहे. कारण तुम्ही त्यां कंपनीला पूर्ण वर्ष देतायं. त्यामुळे पगारवाढ मागताना मनात कोणताही न्यूनगंड ठेवू नका. तो आत्मविश्वासाने मागा. पगारवाढ ही नेहमी टक्केवारीमध्ये मागा. तसेच तुम्ही मागितलेली पगारवाढ ही कशी योग्य आहे, हे कंपनीला पटवून द्या.