Upcoming IPO: जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती असली तरी भारताची स्थिती मात्र तुलनेने मजबूत आहे. 2023 च्या जुलैपासून अनेक कंपन्यांचे IPO येत आहेत. त्यास गुंतवणूकदारांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात 10 पेक्षा जास्त कंपन्यांचे IPO आले. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही काही कंपन्यांचे IPO आले होते. आता पुढील आठवड्यात आणखी 3 कंपन्यांचे IPO येणार आहेत.
SAMHI Hotels, झॅगल प्रिपेड आणि यात्रा ऑनलाइनचा IPO सध्या गुंतवणुकीसाठी खुला आहे. (Upcoming IPO in September 2023) तर EMS लि. आणि ज्युपिटर लाइफ लाइन हॉस्पिटलचा IPO मार्केटमध्ये लिस्ट होईल. पुढील आठवड्यात कोणते IPO येतील ते पाहूया.
साई सिल्क (Sai Silks IPO)
साई सिल्क या कंपनीचा IPO 20 सप्टेंबरला बाजारात येणार असून 22 सप्टेंबरला बंद होईल. 1,201 कोटी रुपये कंपनी भांडवली बाजारातून उभारणार आहे. साई सिल्क ही हैदराबाद स्थित साड्यांची किरकोळ विक्रेती कंपनी आहे. प्रति शेअरची किंमत 210 ते 222 रुपये ठेवण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 67 शेअर्स खरेदी करता येतील. किरकोळ साडी विक्रीमध्ये दक्षिण भारतात कंपनी टॉप 10 मध्ये आहे. पारंपारिक साड्यांची विक्री कंपनीकडून प्रामुख्याने केली जाते.
सिग्नेचर ग्लोबल (Signature Global IPO)
सिग्नेचर ग्लोबल ही कंपनी 730 रुपये भांडवली बाजारातून उभारणार आहे. 20 सप्टेंबरला कंपनीचा आयपीओ खुला होऊन 22 सप्टेंबरला बंद होईल. सिग्नेचर ग्लोबल ही रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी आहे. सुरुवातीला कंपनी 1 हजार कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत होती. मात्र, नंतर ऑफरची रक्कम कमी केली. प्रति शेअरची किंमत 366 ते 385 रुपयांच्या दरम्यान आहे.
वैभव ज्वेलर्स (Vaibhav Jewellers IPO)
वैभव ज्वेलर्स या कंपनीचा IPO 22 सप्टेंबरला खुला होऊन 26 सप्टेंबरला बंद होईल. 270 कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्याच्या तयारीत कंपनी आहे. प्रति शेअरची किंमत 204 ते 215 रुपये ठेवण्यात आली. 69 शेअर्सचा एक लॉट खरेदी करता येईल. 50 टक्के शेअर्स संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. तर 35 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदी करता येतील. 15 टक्के शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात कंपनी ज्वेलरीचा व्यवसाय करते. स्थानिक भागात आणखी व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.