शेअर मार्केटमध्ये आज बुधवारी सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण आहे. आजच्या सत्रात सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडचा शेअरने अप्पर सर्किट गाठले. रेल विकास निगमचा शेअर 5% ने वधारला आणि त्याने 66.70 रुपयांवर गेला. (Rail Vikas Nigam shares jump 5% today) रेल विकास निगमला मालदिवमध्ये 1544.60 कोटींचे कंत्राट मिळाले आहे. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रेल विकास निगमला मालदिवमधील प्रकल्पाचे कंत्राट दिले आहे. मालदिवमध्ये यूटीएफ हार्बर प्रोजेक्टचे काम रेल विकास निगम करणार आहे. पुढील 24 महिन्यात हा प्रकल्प साकारला जाणार आहे. मालदिव आणि भारत सरकारच्या परस्पर सहकार्यानुसार हा प्रोजेक्ट होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1544.60 कोटी इतका असल्याचे रेल विकास निगमने शेअर बाजाराला कळवले आहे.
या वृत्तानंतर आज सकाळच्या सत्रात रेल विकास निगमच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. RVNL चा शेअर 4.96% तेजीसह अप्पर सर्किटमध्ये गेला. दुपारी 12 वाजता RVNL चा शेअर 66.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात 4.96% वाढ झाली. इंट्रा डेमध्ये त्याने 66.70 चा उच्चांकी स्तर गाठला.
आजच्या सत्रात तब्बल 16.06 लाख शेअर्सची देवाणघेवाण झाली . यात 10.81 कोटींची उलाढाल झाली. आजच्या तेजीने रेल विकास निगमच्या बाजार भांडवलात देखील वाढ झाली आहे. रेल विकास निगमचे बाजार भांडवल 13844.53 कोटी इतके वाढले आहे.
रेल विकास निगमने नोव्हेंबर 2022 मध्ये 84.15 रुपयांचा 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला होता. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये 20% घसरण झाली. सध्या हा शेअर 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हींग एव्हरेजपेक्षा वरच्या पातळीवर ट्रेड करत आहे. कंपनीचा स्टॉकबाबत पीई रेशो 10.72 इतका आहे