Blue Tick: तुम्हाला twitter वर ब्लू टिक मिळवायचा असेल किंवा आधीच दिला गेलेला टिक ठेवायचा असेल तर आता तुम्हाला ही सेवा मोफत मिळणार नाहीये. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आता भारतातही पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात ट्विटर ब्लू सेवेसाठी (Tweeter Blue Service) यूजरला दरमहा 650 रुपये द्यावे लागतील. वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी दरमहा 650 रुपये मोजावे लागतील, तर मोबाइल वापरकर्त्यांना दरमहा 900 रुपये मोजावे लागतील.
एलोन मस्कच्या (Elon Musk) ट्विटरने अलीकडेच अमेरिका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवा सुरू केली आहे. या देशांमध्ये ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेण्यासाठी प्रति महिना $8 शुल्क निश्चित करण्यात आले आहे. जर इथल्या लोकांना वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर त्यांना $84 भरावे लागणार आहेत. ट्विटरने याआधीच सांगितले होते की ते Google ला $3 अधिक शुल्क आकारून कमिशन देईल. भारतात ब्लू टिकसाठी वार्षिक शुल्क 6800 रुपये इतके ठेवण्यात आले आहे.
#Twitter - Twitter ने ब्लू टिक वाले यूजर्स को दिया बड़ा झटका, अब करना होगा यह काम @Twitter @elonmusk #ElonMusk #TwitterBlue #bluetick #Subscription #ElonMusktwitter #LatestNews #moneycontrolhttps://t.co/bUSZeTJWiJ
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) February 14, 2023
ट्विटर प्रमाणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर देखील, वापरकर्त्यांना पैसे देऊन ब्लू बॅज दिला जाऊ शकतो. Instagram देखील त्याच्या उल्लेखनीय वापरकर्त्यांना ब्लू टिक व्हेरिफिकेशन देत असते आतापर्यंत इन्स्टाग्रामवर हा ब्लू बॅज पडताळणीनंतर कंपनीतर्फेच दिला जात होता, परंतु आता रिव्हर्स इंजिनियर अलेसेंड्रो पलुझी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत संकेत दिले आहेत की, लवकरच Instagram ब्लू बॅजसाठी सशुल्क व्हेरिफिकेशन स्कीम आणू शकते.
There are reports that the blue tick service is also likely to be introduced on the social sharing application Instagram in exchange for money.
— TechJuice (@TechJuicePk) February 13, 2023
Read more: https://t.co/QIm0jAVWD3#instagram #bluetick #service pic.twitter.com/0THf522Qbu
या ब्लू टिक्स काय आहेत
ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क ट्विटरमध्ये नवनवीन बदल करत आहेत, प्रयोग करत आहेत.अलीकडच्या काळातला ब्लू टिकसंदर्भात ट्विटरचा हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे, जो अकाउंट व्हेरिफिकेशनशी संबंधित आहे. सत्यापित खात्यांसाठी (Verified Account) ट्विटरची जुनी ब्लू टिक पॉलिसी बदलण्यात आली आहे. आता सत्यापित खाती तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत.
13 एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केली. मस्क यांनी $ 54.2 प्रति शेअर दराने $ 44 बिलियनमध्ये ट्विटर हा प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची ऑफर दिली होती. मात्र नंतर हा करार थांबवण्यात आला होता. यानंतर 8 जुलै रोजी एलोन मस्क यांनी हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मग अचानक ऑक्टोबरच्या सुरुवातीला मस्क यांनी करारावर पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. इलॉन मस्क 26 ऑक्टोबर रोजी ट्विटरची खरेदी केली.
अनपेड ब्लू टिक्सचे काय होईल?
एक प्रश्न लोक पुन्हा पुन्हा विचारत आहेत की ज्यांच्याकडे आधीच ब्लू टिक आहे किंवा ज्यांनी सबस्क्रिप्शनशिवाय ब्लू टिक घेतली आहे त्यांचे काय होईल? इलॉन मस्कने याबाबत आधीच स्पष्ट केले आहे, प्रत्येकाची ब्लू टिक काढली जाईल. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरच यूजर्सला ट्विटर ब्लू टिक मिळेल. हे नवीन फिचर लागू झाल्यानंतरच शुल्क न भरलेल्या ब्लू टिक्स काढल्या जातील. यास काही वेळ लागू शकतो. मग जर तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला ट्विटरचे पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
2021च्या आकडेवारीनुसार ट्विटरवर सुमारे 4 लाख व्हेरिफाय युझर्स आहेत.2022 अखेर पर्यंत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या युझर्सची संख्या लक्षात घेता ट्विटरला नवीन नियमानुसार प्रत्येक महिन्याला 26 कोटी रुपये व्हेरिफाय अकाऊंट्स होल्डरकडून मिळणार आहेत. तर प्रत्येक वर्षी या युझर्सकडून 312 कोटी रुपये मिळणार आहेत. अर्थात ट्विटरच्या या नवीन नियमामुळे काही व्हेरिफाय अकाऊंट्स कमी होण्याची किंवा काही अकाऊंट्स वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.अर्थात ट्विटरच्या व्हेरिफाय अकाऊंट्समध्ये वाढ झाल्यास इलॉन मस्कच्या प्रॉफिटमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की! Elon Musk यांनी ट्विटरच्या डीलसाठी 44 बिलिअन डॉलर्स मोजले आहेत. अर्थात यासाठी इलॉन मस्कने आर्थिक तरतूद केली असेल. पण हा खर्च भरून काढण्यासाठी इलॉन मस्कने Blue Tick युझर्सकडून पैसे घेण्याची योजना आखली असेल.