Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Royal Enfield E bike: लवकरच दाखल होणार रॉयल एनफिल्डची गॅसोलिन! लॉन्चिंग, फीचर्स आणि बरंच काही...

Royal Enfield E bike: लवकरच दाखल होणार रॉयल एनफिल्डची गॅसोलिन! लॉन्चिंग, फीचर्स आणि बरंच काही...

Image Source : www.aajtak.in

Royal Enfield E bike: भारतातली एक अग्रगण्य दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डनं बहुप्रतिक्षित अशा आपल्या इलेक्ट्रिक बाइकचं डिझाइन सादर केलं आहे. रॉयल एनफिल्डची बुलेट प्रचंड लोकप्रिय आहे. आता विना इंधन बॅटरीवर चालणारी बुलेट लवकरच रस्त्यावर धावणार आहे.

बाइक चालवताना रॉयल लुक देणारी दुचाकी म्हणजे रॉयल एनफिल्डची बुलेट (Royal Enfield Bullet)... या बाइकचा अपिअरन्स आणि आवाज सर्वांनाच आपल्याकडे खेचत असतो. याच कारणास्तव देशातच नाही, तर परदेशातदेखील बुलेटची क्रेझ आहे. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel price hike) वाढल्यानं अलिकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांनादेखील पसंती दिली जात आहे. मात्र तरीदेखील सर्वसामान्य लोक लुक आणि इतर फीचर्सबाबत कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन आणतानादेखील कंपन्या या सर्वांचाच विचार करतात. हा विचार रॉयल एनफिल्डनंदेखील केल्याचं दिसतं.

नवी कोरी गॅसोलिन

कर्नाटकातल्या बेंगळुरू इथल्या बुलेटियर कस्टम्सनं ही इलेक्ट्रिक बुलेट प्रत्यक्षात आणली आहे. गॅसोलिन असं नामकरण या बाइकचं करण्यात आलं आहे. ही काही पेट्रोलवर चालणारी बुलेट नाही. तर बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बुलेट आहे. त्यामुळे ती चालवताना कदाचित आवाजाचा फील तुम्हाला अनुभवता येणार नाही.

1984च्या मॉडेलवर आधारित 

इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्ड ही बुलेट 1984च्या मॉडेलवर आधारित आहे. बॉबर लुक असून यासाठी चेसिसला 3 इंचांनी लांब करण्यात आलं आहे. नव्या डिझाइची इंधन टाकी आहे. बाइक कंट्रोलर त्यात असणार आहे. याचं कंट्रोलर नायट्रो बुस्ट सिस्टम देतं. तर त्या खालोखाल बॅटरी लावण्यात आलेली आहे. साधारणपणे त्याठिकाणी इंधनावरच्या बाइकला इंजिन बसवलेलं असतं. हे इंजिन भासावं म्हणून त्याचं डिझाइनदेखील तसंच करण्यात आलं आहे. 5kW क्षमतेची हब मोटर असणार आहे. तर 72 व्होल्ट 80 Ah क्षमता असणारा बॅटरी पॅक आहे.

ड्रायव्हिंग मोड्स

बाइकला 3 ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रिव्हर्स मोडही यात आहे. रेग्यूलर मोडमध्ये बाइक 90 किमी तर इकॉनॉमी मोडमध्ये 100 किलोमीटरची रेंज देणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. टॉप स्पीड 110 किमी असणार आहे. बॅटरी चार्जिंगविषयी बोलायचं झाल्यास, जवळपास 7 तासांत बॅटरी पूर्ण चार्ज होते. घरगुती 15 अ‍ॅम्पियरच्या सॉकेटमधूनही ती चार्ज करता येईल.

लॉन्चिंग कधी?

बुलेटचं इंजिन जवळपास 45 किलो आहे. मात्र त्या जागेवर लावलेल्या बॅटरीचं वजन केवळ 37 किलो इतकं कमी आहे. बाइकचं एकूण वजन 145 किलो इतकं आहे. त्यामुळे रस्त्यावरदेखील ती सुसाट धावणार आहे. या बाइकच्या निर्मितीला 3 लाखांच्या आसपास खर्च आल्याचा दावा विविध अहवालातून करण्यात आला आहे. दरम्यान, या बाइकसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 2024 साली ती लॉन्च होण्याचा अंदाज आहे.