आपण प्रत्येक ठिकाणी आपली बाईक घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथे बाईक रेटंवर मिळत असल्यास आपण ती घेतो. आता राॅयल एनफिल्डने बाईक रेंटवर देणाऱ्या ऑपरेटर्सच्या पार्टनशीपमध्ये लोकांना रॉयल एनफिल्ड बाईक उपलब्ध करून देण्यासाठी रॉयल एनफिल्ड रेंटल्स प्रोग्राम सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांना राॅयल एनफिल्ड चालवण्याचा आनंद घ्यायचा आहे. ते या प्रोगामद्वारे राॅयल एनफिल्ड रेंटवर घेऊ शकणार आहेत.
या शहरात आहे बाईक्स उपलब्ध
राॅयल एनफिल्डने रेंटल प्रोग्राम सुरू करुन, बुलेट प्रेमींना सुखद धक्का दिला आहे. कारण, या बाईकची क्रेझ सर्व स्तरामध्ये साराखीच आहे. या प्रोग्रामद्वारे भारतातील 25 शहर आणि ठिकाणांवर 40 हून अधिक बाईक्स रेंटवर देणाऱ्या ऑपरेटर्सचा समावेश आहे. ज्याद्वारे कंपनी 300 बाईक लोकांच्या सेवेत या ठिकाणी उपलब्ध करुन देणार आहे. सध्या हा प्रोग्राम अहमदाबाद, मुंबई, गुजरात, महाराष्ट्र, चंदीगड, धर्मशाला, लेह, मनाली, हरिद्वार आणि ऋषिकेशसह अन्य शहरांमध्ये ही उपलब्ध आहे.
प्रत्येक रायडर्सला घेता येईल लाभ
हे मोठे पाउल उचलल्यानंतर रॉयल एनफील्डचे मुख्य ब्रँड ऑफिसर मोहित धर जयाल म्हणाले की, मोटरसायकल रेंटल आणि टूर ऑपरेटर्स आणि मेकॅनिक्सच्या आमच्या विस्तारित कुटुंबाने आमची संस्कृती आणि प्युअर मोटरसायकलिंगच्या मिशनला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
तसेच, आमच्या प्रयत्नांबरोबरच, या विस्तारित इकोसिस्टमच्या लोकांनी आमच्या मोटारसायकलींसाठी व्यापक अॅक्सेस आणि आकांक्षा निर्माण केली आहे. त्यांच्या या विधानावरुन राॅयल एनफिल्ड प्रत्येक रायडर्सपर्यंत पोहचावी अशी कंपनीची इच्छा दिसत आहे.
अशी करा बुक रेंटवर
बाईक रेंटवर घ्यायची प्रोसेस खूप सोपी आणि युझर फ्रेंडली आहे. फक्त ज्यांना रॉयल एनफिल्ड रेंटवर हवी आहे. त्यांना रॉयल एनफिल्ड रेंटलच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल, शहर निवडावे लागेल, बाईक रेंटवर घेण्याचा दिवस आणि वेळ तसेच, जमा करण्याचा दिवस आणि वेळ नोंदवणे आवश्यक आहे.
त्यांनतर निवडलेल्या अवधीसाठी तुम्हाला उपलब्ध माॅडेल्स आणि रेंटच्या खर्चाची यादी दिसणार आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट कराल तेव्हा तुम्हाला ऑपरेटरचे डिटेल्स दिले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक रेंटवर घेताना तुम्हाला डिपाॅझिट द्यावी लागू शकते. जी तुम्ही बाईक जमा केल्यानंतर तुम्हाला परत मिळेल.