रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे आकर्षण सर्वच स्तरातून आपल्याला पाहायला मिळते. बुलेटची जादूच अशी आहे की तरुणाई आपोआप बुलेटकडे ओढली जाते. आता कंपनी नवीन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे माॅडेल 1 सप्टेंबर 2023 रोजी लाॅंच होणार आहे. नव्या बुलेटमध्ये कोणती फिचर्स आहेत ते पाहुया.
दोन्ही व्हीलवर डिस्क ब्रेक
रॉयल एनफिल्ड महत्वाच्या अपडेटसह लाॅंच होणार असून नवीन आणि अपडेट J-प्लॅटफॉर्मवर बेस असणार आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मध्ये 2010 पासून वापरात असलेले इंजन 346cc UCE च्या जागी नवीन इंजन 349cc असणार आहे. कंपनीच्या इतर J-प्लॅटफॉर्म मॉडेल्सनुसार 20 hp पॉवर आणि 27 Nm डिलीव्हर होण्याची अपेक्षा केली जात आहे. तरी याविषयी कंपनीने अजून कोणतीही आकडेवारी दिली नाही. या नवीन बुलेट 350 मध्ये ड्युअल-चॅनल ABS सह दोन्ही व्हीलवर डिस्क ब्रेक असणार आहेत.
The nation and the motorcycle, battle proven and built to last. Steadfast in service, Royal Enfield Bullet.#HappyIndependenceDay #RoyalEnfieldBullet #BulletMeriJaan #RoyalEnfield #RidePure #PureMotorcycling pic.twitter.com/UUxBuxfGj2
— Royal Enfield (@royalenfield) August 15, 2023
नवीन डिझाईन मिळेल पाहायला
क्लासिक 350 मध्ये सध्या जे घटक आहेत तेच नवीन बुलेट 350 मध्ये पाहायला मिळतील. यामध्ये इंजिन आणि चेसिसची डिझाईनही जवळपास सारखीच असण्याची शक्यता आहे. तसेच काही युनिक डिझाईन ही पाहायला मिळू शकते. या नवीन बुलेटच्या फीचर्सविषयी पाहायला गेल्यास, यामध्ये सिंगल-पीस सीट उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये नवीन टेल-लॅम्प, बॅटरी बॉक्स आणि नवीन हेडलाईट डिझाईन मिळणार आहे. नवीन बुलेट 350 फ्युएल टँक आणि साईड पॅनल्सवर पारंपारिकरित्या हाताने पेंट केलेले पिनस्ट्राईप्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे बुलेटची ज्या गोष्टीमुळे ख्याती आहे. ती अबाधित राहणार आहे.
किंमत अजून नाही ठरली!
या नवीन बुलेट 350 ची किंमत अजून ठरली नसून लाॅंचच्या दिवशीच म्हणजेच 1 सप्टेंबरला ती जाहीर होणार आहे. मात्र, नवीन बुलेट 350 ची किंमत हंटर 350 आणि क्लासिक 350 च्या किमतींच्यादरम्यान असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, अन्य फिचर्सविषयी आणि बाईकच्या डिटेल्ससाठी 1 सप्टेंबरपर्यंत वाट पाहणे आवश्यक आहे. कारण, कंपनी लाॅंचच्या दिवशीच या गोष्टी उघड करणार आहे.